भारतात कोरोना संसगार्ची वाढ अत्यंत वेदनादायक आहे. ज्यांनी या साथीमुळे आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करते. कोरोना रूग्णांच्या उपचारांसाठी आम्ही ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कंसंट्रेटर, मास्क आणि रेमेडासिव्हिर इंजेक्शन्स भारतात पाठवत आहोत. आम्ही भारतात साथीच्या रोगाचा अंत करण्यासाठी आणखी मदत पाठविण्यासाठी तयार आहोत,असे आश्वासन अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरीस यांनी दिले.We are ready to send more aid to India, assures US Vice President Kamala Harris
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : भारतात कोरोना संसगार्ची वाढ अत्यंत वेदनादायक आहे. ज्यांनी या साथीमुळे आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करते. कोरोना रूग्णांच्या उपचारांसाठी आम्हीऑ क्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कंसंट्रेटर, ठ-95 मास्क आणि रेमेडासिव्हिर इंजेक्शन्स भारतात पाठवत आहोत.
आम्ही भारतात साथीच्या रोगाचा अंत करण्यासाठी आणखी मदत पाठविण्यासाठी तयार आहोत,असे आश्वासन अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरीस यांनी दिले.
कमला हॅरिस म्हणाल्या की, ‘भारत आणि इतर देशांनी आपल्या लोकांना लवकरात लवकर लसी देण्यास मदत करण्यासाठी आम्ही कोरोना लसीवरील पेटंट निलंबित करण्यासाठी पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
जगभरात भारत आणि अमेरिकेत कोविडची संख्या सर्वाधिक आहे. सोमवारी 26 एप्रिल रोजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मदत पाठवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर अमेरिकेने शुक्रवारी 30 एप्रिल रोजी भारताला मदत साहित्य पुरवले.
हॅरिस म्हणाल्या की, कोरोना साथीच्या सुरूवातीला जेव्हा आमच्या रूग्णालयाचे बेड वाढविण्यात आले तेव्हा भारताने मदत पाठविली होती. आज आम्ही भारताला त्याच्या आवश्यक वेळी मदत करण्याचा निर्धार केला आहे.
आम्ही भारताला आशियाई क्वाडचे सदस्य म्हणून आणि जागतिक समुदायाचा एक भाग आणि मित्र म्हणून पहात आहोत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App