वापरकर्त्यांच्या संतापानंतर माघार, प्रायव्हसी पॉलीसी स्वीकारली नसली तरी चालूच राहणार व्हॉटसअ‍ॅप


युजर्सची वाढती नाराजी आणि स्पर्धक कंपन्यांकडे वाढणारा ओढा पाहाता व्हॉटसअ‍ॅप कंपनीने माघार घेतली असून १५ मेपर्यंत नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकार न करणाऱ्या युजर्सचे अकाऊंट बंद करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. Withdrawal after user outrage, WhatsApp will continue even if privacy policy is not accepted


विशेष प्रतिनिधी

मुंबई : युजर्सची वाढती नाराजी आणि स्पर्धक कंपन्यांकडे वाढणारा ओढा पाहाता व्हॉटसअ‍ॅप कंपनीने माघार घेतली असून १५ मेपर्यंत नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकार न करणाऱ्या युजर्सचे अकाऊंट बंद करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

१५ मेपासून कोणतंही अकाउंट डिलीट केलं जाणार नाही. यासंदर्भात पुढच्या काही आठवड्यांमध्ये युजर्सला याचे रिमाइंडर्स देखील पाठवले जातील असे कंपनीच्या प्रवक्तयाने म्हटले आहे. त्यामुळे नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्याचा पर्याय ऐच्छिक ठेवण्यात आला आहे.



 

जगभरात मोठ्या संख्येनं नेटिझन्स व्हॉट्सअ‍ॅप या मेसेजिंग अ‍ॅपचा वापर करतात. भारतात तर हे प्रमाण प्रचंड आहे.

जानेवारी महिन्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या प्रयव्हसी पॉलिसीमध्ये बदल केल्याची घोषणा केली. नवीन प्रायव्हसी पॉलिसी लागू करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने सुरुवातीला ८ फेब्रुवारीची डेडलाईन दिली होती. तोपर्यंत युजर्सनी नवी प्रायव्हसी पॉलिसी स्वीकार करणं अपेक्षित होतं. मात्र, या मुद्द्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपने पुन्हा १५ मे ही डेडलाईन जाहीर केली. तोपर्यंत प्रायव्हसी पॉलिसीला मंजुरी न दिल्यास संबंधित युजरची व्हॉट्सअ‍ॅप सेवा बंद होईल असं देखील सांगण्यात आलं.

नव्या पॉलिसीमुळे युजर्सची खासगी माहिती, संभाषण, कॉल लॉग्ज ही सर्व माहिती फेसबुकला दिली जाईल, अशी शंका घेतली जाऊ लागली. त्यामुळे युजर्सच्या राईट टू प्रायव्हसीचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, असे काहीही नसून युजर्सची माहिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचा खुलासा देखील करण्यात आला. तसेच, युजर्सच्या माहितीचा वापर फक्त फेसबुकसाठीच्या मार्केटिंगमध्येच केला जाईल, त्यातही एंड टू एंड चॅट्स किंवा कॉल लॉग्जच्या माहितीचा वापर केला जाणार नाही असं देखील सांगण्यात आलं. मात्र, यामुळे युजर्सचं समाधान होऊ शकलं नाही.

Withdrawal after user outrage, WhatsApp will continue even if privacy policy is not accepted

महत्वाच्या  बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात