ज्यो बायडेन यांनी जोक केला भारतातल्या पाच ‘बायडेनां’बद्दल


जागितक दहशतवाद, हिंद-प्रशांत महासागरातील चीनच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा, अफगाणीस्थानातली ढासळती स्थिती, कोरोनानं मंदावलेले जागतिक अर्थचक्र अशा गंभीर काळातही जागतिक नेते एकत्र येतात तेव्हा विनोदाच्या चार गप्पागोष्टी होतात. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत हेच घडले. US President Joe Biden, meeting with Prime Minister Narendra Modi this evening at the White House which raised much laughter during their joint press meet.


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : ज्यो बायडेन आणि नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी संध्याकाळी व्हाईट हाऊस येथे भेट झाली. ज्यो बायडेन निवडून आल्यानंतरची ही त्यांची मोदींसमवेतची पहिलीच भेट होती. साहजिकच यावेळी हास्यविनोद झाला आणि व्हाईट हाऊसमध्ये हास्याचे फवारे उडाले.

बायडेन यांनी मोदी यांना किस्सा सांगितला. ते म्हणाले, की भारतात ‘पाच बायडेन’ आहेत. या ‘बायडेन’ने भारतीय महिलेशी विवाहही केला आहे. बायडेन-मोदी यांच्या एकत्रित पत्रकार परिषदेत हा प्रसंग घडला. त्याच मिश्किलपणे मोदी यांनीही त्यांना ‘माहिती’ पुरवली की, भारतातल्या ‘बायडेन’चा शोध तुम्हाला नेमकेपणाने घेता यावा म्हणून मी तुमच्यासाठी काही कागदपत्रं सोबत घेऊनच आलोय. मोदींच्या या हजरजबाबीपणावर बायडेन यांनाही हसू आवरले नाही.

”मला नक्की आठवत नाही पण मी सिनेटर म्हणून 28 वर्षांचा तरुण असताना 1972 मध्ये निवडून आलो. माझा शपथविधी होण्यापूर्वीच मला मुंबईतून ‘बायडेन’ या नावाच्या व्यक्तीचे पत्र आले. पण नंतर मला त्याचा पाठपुरावा करता आला नाही…पण दुसऱ्याच दिवशीच्या पत्रकार परिषदेत इंडियन प्रेसने सांगितले की भारतात पाच ‘बायडेन’ आहेत म्हणून,” असे बायडेन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. वास्तविक अमेरिकी राष्ट्राध्यक्ष नियोजित मुद्यांखेरीज एकही शब्द सहसा बोलत नाहीत पण मोदींच्या सहवासात आल्यानंतर तेही खुलले. अर्थातच बायडेन यांनी सांगितलेला हा किस्सा ऐकून मोदीही हसले.बायडेन पुढे म्हणाले की, ”मी गंमतीने म्हणालो की मला भारतात कँप्टन जॉर्ज बायडेन नावाची व्यक्ती सापडली. ते ईस्ट इंडियन चहा कंपनीत कँप्टन होते…” तो एक शुद्ध विनोद होता असे स्पष्ट करण्यास बायडेन विसरले नाहीत. ”मात्र या सगळ्याचा शेवट असा झाला की तो (जॉर्ज बायडेन) तिथेच राहिला आणि भारतीय महिलेशी त्याने लग्न केले. आणि मला त्याचा शोध कधीच घेता आला नाही. त्यामुळे मोदी यांच्यासोबतच्या या संपूर्ण बैठकीचा उद्देशच त्या जॉर्जचा शोध घेणे हा आहे,” असे म्हणत त्यांनी खूप गांभिर्याने मोदी यांच्याकडे पाहिले आणि त्यानंतर संपूर्ण दालनात हशा पिकला.

“गंमत पुरे झाली. पण भारत आणि अमेरिका या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रांमधली मैत्री, सहकार्य हे भविष्यात अधिक बळकट, निकटचे आणि घट्ट होणार आहे,” असे बायडेन म्हणाले. पण बायडेन यांच्या विनोदाला तितक्याच मिश्लिकपणे उत्तर देताना मोदीही म्हणाले की, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासाठी मी भारतातल्या बायडेन यांची आख्ख्या वंशावळीची कागदपत्रंच सोबत घेऊन आलो आहे.
“तुम्ही बायडेन आडनावाचा उल्लेख केलात. यापूर्वीही तुम्ही या संदर्भात माझ्याशी बोलला होतात. मग मी प्रयत्न केला आणि कागदपत्रे शोधून काढली आणि तुमच्यासाठी ती सोबत आणली आहेत. कदाचित या कागदपत्रांचा कधीतरी उपयोग होईलच,” असे सांगत मोदी यांनी म्हणताच बायडेन यांनी डोळे मिचकावले आणि ते म्हणाले, “मी निश्चिंत झालो आता.”

मुंबईतल्या त्या दूरच्या नातेवाईकांबद्दल बायडेन नेहमीच जोक करतात. सन 2013 मध्ये बायडेन यांनी मुंबईला भेट दिली होती तेव्हाही त्यांनी श्रोत्यांमध्ये असणाऱ्या एका जनुकशास्त्रज्ञाला मुंबईतल्या बायडेन मंडळींचा शोध घेण्यास सांगितले होते. दोन वर्षांनी वॉशिंग्टनमधल्या एका कार्यक्रमात त्यांनी याचा पुनरुच्चार करत म्हटले होते की मुंबईत पाच बायडेन वास्तव्यास आहेत. वॉशिंग्टन येथे 2015 मध्ये केलेल्या त्या भाषणात ते म्हणाले होते, “ग्रेट, ग्रेट, ग्रेट, ग्रेट, ग्रेट ग्रँडफादर जॉर्ज बायडेन यांनी भारतात स्थायीक होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी भारतीय स्त्रीशी लग्न केले.”

दरम्यान, मोदी यांच्याशी झालेल्या बैठकीपूर्वी बायडेन म्हणाले की, भारत-अमेरिका यांच्यातील संबंधांमुळे जगापुढची अनेक आव्हाने सोडवणे शक्य आहे यावर पूर्वीपासून माझा विश्वास आहे. मागे 2006 मध्येच मी म्हणालो होतो की 2020 पर्यंत भारत आणि अमेरिका हे जगातले घनिष्ट संबंध असणारे देश होतील.

US President Joe Biden, meeting with Prime Minister Narendra Modi this evening at the White House which raised much laughter during their joint press meet.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”