तालीबान्यांना चीन वाटतो आपला मित्र, उईगर मुस्लिमांना अफगणिस्थानमध्ये शरण देणार नसल्याचे केले स्पष्ट


विशेष प्रतिनिधी

बीजिंग: अमेरिकन सैन्य परत गेल्यावर तालीबान्यांनी अफगणिस्थानच्या बहुतांश भागांवर ताबा मिळविला आहे. धक्कादायक म्हणजे चीन आपला मित्र असल्याचे तालीबान्यांकडून सांगितले जात असल्याने चीनचा तालीबान्यांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनकडून दडपशाही होत असलेल्या उईगर मुस्लिमांना आपण शरण देणार नसल्याचेही तालीबानने म्हटले आहे.The Taliban think China is their friend, made it clear that Uyghur Muslims would not be granted asylum in Afghanistan

तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहीन म्हणाले, अफगाणिस्तानच्या पुर्नउभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या गुंतवणुकीबाबत चीनसोबत लवकरात लवकर चर्चा करण्यास उत्सुक असल्याचे तालिबानने म्हटले आहे. अफगाणिस्तानमधील ८५ टक्के भाग हा आमच्या नियंत्रणात आहे.



चिनी गुंतवणूकदार आणि त्यांचे कर्मचारी, कामगार अफगाणिस्तानमध्ये पुन्हा येणार असतील, तर त्यांच्या सुरक्षितेची खात्री देत आहोत. आम्ही चीनचे स्वागत करतो. त्यांना गुंतवणूक करण्याची इच्छा असल्यास आम्ही त्यांना सुरक्षिता देण्यास तयार आहोत.चीनमधील उइगर मुस्लिम फुटीरतावाद्यांना अफगाणिस्तानमध्ये शरण देणार नाही.

सुहैलने म्हटले की, अल कायदा अथवा अन्य कोणत्याही दहशतवादी संघटनांना अफगाणिस्तानमधून आपल्या कारवाया चालवता येणार नाही. याआधी काही उइगर संघटनांचे बंडखोर अफगाणिस्तानमध्ये शरण मागण्यासाठी आले होते. मात्र, क्षेत्रामध्ये शांतता, स्थिरता हवी असल्यास शेजार आणि इतर जवळच्या देशांसोबत चांगले संबंध असावेत. भारतासोबतही शांतता हवी आहे.

दरम्यान, इराणच्या सीमेवरील व्यूहरचनात्मक दृष्टीने महत्त्वाच्या इस्लामकाला या गावावर तालिबानने ताबा मिळवला आहे. इराणपासून चीनपर्यंतच्या सर्व सीमाभागावर ताबा मिळवला आहे. अमेरिकेने सैन्य माघारीची घोषणा केली असून, संपूर्ण सैन्य ३१ ऑगस्टपर्यंत माघारी येणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीर केले.

त्याचबरोबर तालिबान आणि अफगाणिस्तान सरकार यांच्यामध्ये शांतता चर्चा सुरू आहे. अंतिम तोडग्यापूर्वी जास्तीत जास्त भूभाग ताब्यात ठेवण्यासाठी तालिबानने हल्ले तीव्र केले आहेत. अफगाणिस्तानातील ३९८पैकी २५० जिल्हे नियंत्रणाखाली असल्याचे तालिबानच्या रशियातील शिष्टमंडळाने म्हटले आहे.

इस्लाम काला शहरावर ताबा मिळवल्याचे तालिबानचा म्होरक्या झबिहुल्ला मुजाहीद यांनी सांगितले. या शहरात अद्याप संघर्ष सुरू असल्याचे अफगाणिस्तानच्या सरकारकडून सांगण्यात आले.अफगाणिस्तानातील लक्ष्याची पूर्ती झाल्यानंतर २० वर्षांतील मोहीम थांबवत, ३१ ऑगस्ट रोजी अमेरिकेची मोहीम संपेल, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी केली.

अफगाणिस्तान सरकार संपूर्ण देशावर प्रभाव ठेवण्याची शक्यता सद्यस्थितीमध्ये दिसून येत नाही. मात्र, परिस्थिती जैसे थे ठेवणे, हा पर्याय असू शकत नाही. अमेरिकेच्या आणखी एका पिढीला मी अफगाणिस्तानातील युद्धामध्ये पाठवू इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया बायडेन यांनी दिली.

The Taliban think China is their friend, made it clear that Uyghur Muslims would not be granted asylum in Afghanistan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात