युक्रेन सीमेवर रशियाकडून सात हजार सैन्य तुकड्या तैनात; सैन्य माघारी घेतल्याचा नुसता देखावाच ; अमेरिकेचा गंभीर आरोप


विशेष प्रतिनिधी

मॉस्को : रशियाने युक्रेनच्या सीमेवरून सैन्य माघारी घेण्याची घोषणा केली होती. यामुळे युद्ध टळले होते. पण,रशियाने सीमेवर हजारो सैनिकांच्या तुकड्या पुन्हा तैनात केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.Russia deploys 7,000 troops to Ukraine border; The mere appearance of a military withdrawal; Serious US allegations

रशियाने सैन्य माघारी घेतल्याचे वृत्त अमेरिकेने फेटाळून लावले असून रशियाने सीमेजवळ आणखी ७ हजारांहून अधिक सैनिकांच्या तुकड्या तैनात केल्या आहेत, असा दावा अमेरिकेच्या अधिकाऱ्याने केला. रशियाने युक्रेनच्या सीमेवरील सैन्य तैनाती कमी केल्याचा दावा अमेरिकेने फेटाळून लावला आहे. ‘रशियाचा सैन्य माघारीचा दावा खोटा आहे,’ असे अमेरिकेच्या अधिकाऱ्याने वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.



रशियाने दीड लाखांहून अधिक सैन्य तैनात केले आहे. यामुळे युद्धाचे संकट निर्माण झाले होते. दरम्यान, युद्ध सराव संपल्यानंतर सैन्य माघारी परततील, असे रशियाने सांगितले आहे. याबाबत व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात सैन्यांच्या तुकड्या माघारी बोलावण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे म्हटले आहे. पण यावरुन अमेरिकेने पुन्हा रशियावर आरोप केला आहे.

Russia deploys 7,000 troops to Ukraine border; The mere appearance of a military withdrawal; Serious US allegations

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात