रशिया आणि युक्रेनमध्ये वाढता तणाव!


विशेष प्रतिनिधी

बेलारूस : रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधील तणाव वाढत चालला आहे. रशिया युक्रेनची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा युक्रेनचे नवीन संरक्षणमंत्री ओलेसी रेजनिकोव यांनी मागच्या आठवड्यात केला होता. मागील आठवड्यात ते अमेरिकन दौऱ्यावर होते. याचवेळी त्यांनी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र साठय़ाची मागणीदेखील केली होती.

Rising tensions between Russia and Ukraine!

या मागणीनुसार अमेरिकेने देखील युक्रेनला मिसाईल, ड्रोन संरक्षण करणारे शस्त्र, जॅमिंग उपकरणे, रणगाडा विरोधी जेवलिन मिसाईल आणि रडार देऊ केले आहेत. तसेच दहा युद्धनौका आणि नवीन मिसाईल डिफेन्स सिस्टीम देण्याचाही करार यावेळी करण्यात आला आहे.


Russian Prime Minister tests positive for Covid-19


तर रशियाकडून युक्रेनच्या उत्तर दिशेला बेलारूस कडून हल्ल्याची योजना आखत आहेत असे युक्रेनच्या गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीनुसार समजते. जानेवारीच्या अखेरपर्यंत रशिया युक्रेनवर तिन्ही बाजूंनी हल्ला करण्याच्या तयारीत आहे तर उत्तर दिशेतील बेलारस कडून हल्ल्याची योजना देखील रशियाकडून आखली जात आहे ल, असा दावा गुप्तहेरांनी केला आहे. 3500 सैनिक युक्रेनच्या सीमेजवळ पॅराशूटने उतरले आहे. तर दुसर्या बाजूने रशियाने मात्र युक्रेनचा हा दावा फेटाळून लावला आहे.

Rising tensions between Russia and Ukraine!

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”