पंतप्रधान मोदी- राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यात दीड तास बैठक, काय-काय झाली चर्चा? वाचा सविस्तर…


पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात काल व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान दोन्ही देशांना नवी ताकद देण्यावर आणि हवामान बदल, कोविड-19 सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. ओव्हल कार्यालयात दोन्ही नेत्यांच्या भेटीदरम्यान खूप उत्साह दिसून आला. तज्ज्ञांच्या मते, दोन्ही नेत्यांची ही भेट आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचा नवा अध्याय ठरणार आहे.meeting between modi and biden lasted for one and half hour biden says next time the program should be more than two days


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात काल व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान दोन्ही देशांना नवी ताकद देण्यावर आणि हवामान बदल, कोविड-19 सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. ओव्हल कार्यालयात दोन्ही नेत्यांच्या भेटीदरम्यान खूप उत्साह दिसून आला. तज्ज्ञांच्या मते, दोन्ही नेत्यांची ही भेट आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचा नवा अध्याय ठरणार आहे.

दीड तास चालली द्वीपक्षीय बैठक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची द्विपक्षीय बैठक नियोजित 1 तासाऐवजी 1.5 तास चालली. या बैठकीतील विषय इतके सखोल होते की बायडेन म्हणाले की, पुढच्या वेळी जेव्हा भेटू तेव्हा 2 दिवसांपेक्षा जास्त नियोजन केले पाहिजे.


ज्यो बायडेन यांनी जोक केला भारतातल्या पाच ‘बायडेनां’बद्दल


वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, बायडेन यांना भेटण्याव्यतिरिक्त, क्वाड शिखर संमेलन अतिशय व्यावहारिक आणि उपयुक्त ठरले. जे इतर शिखर परिषदांपेक्षा बरेच वेगळे होते. बर्‍याच मुद्द्यांवर चर्चा झाली ज्यात तंत्रज्ञान, अफगाणिस्तान, दहशतवाद, लसी इत्यादींचा समावेश होता. क्वाड उपक्रमांतर्गत 8 दशलक्ष बायो ई-लस भारतातून सुरू करण्यात येतील.

या द्विपक्षीय बैठकीत दोघांच्या देहबोलीतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, दोन्ही देश मैत्रीची पुन्हा व्याख्या करण्यासाठी आणि त्यावर पुढे जाण्यासाठी हतबल आहेत. बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील या मैत्रीची छाप लवकरच आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीमध्ये दिसून येईल.

काय म्हणाले जो बायडेन?

व्हाईट हाऊसच्या ओव्हल कार्यालयात पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले की, ते आज अमेरिका-भारत संबंधांचा नवीन अध्याय सुरू करत आहेत. बिडेन यांनी भारतीय आणि अमेरिकन माध्यमांना सांगितले की, अमेरिका-भारत संबंध जागतिक आव्हाने सोडवण्यास मदत करू शकतात, यावर त्यांचा विश्वास आहे. ते म्हणाले, “आमच्या दृष्टीने जी सर्वात कठीण आव्हाने आहेत, त्यांचा सामना करत भारत आणि अमेरिकेच्या संबंधांचा एक नवा अध्याय सुरू करत आहोत.”

बायडेन यांच्याशी झालेली शुक्रवारची बैठक “महत्त्वाची” असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले की, या शतकाच्या तिसऱ्या दशकात त्यांची भेट होत आहे. ही बैठक एका तासाहून अधिक काळ चालली. पंतप्रधान मोदी बायडेन यांना म्हणाले, “या दशकाचे स्वरूप कसे राहील, यामध्ये तुमच्या नेतृत्वाची निश्चितच महत्त्वाची भूमिका आहे. भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान मजबूत मैत्रीचे बीजे रुजली आहेत.”

meeting between modi and biden lasted for one and half hour biden says next time the program should be more than two days

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”