थायलंडमध्ये महिला कर्मचाऱ्याने तेलाचे गोदाम पेटविले; तक्रारीची घेतली नसल्याने संताप


वृत्तसंस्था

बँकॉक : थायलंडमध्ये एका महिला कर्मचारीने मालक तक्रारीची दाखल घेत नसल्या कारणामुळे चक्क तेलाच्या गोदामालाच आग लावून दिली. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. In Thailand, a female employee set fire to an oil depot; Anger for not taking the complaint

डेली मेलच्या म्हणण्यानुसार, अॅन श्रिया (३८ ) हिने कागदाच्या एका तुकड्याला आग लावला आणि तो पेट्रोलच्या कंटेनरवर फेकून दिला, ज्यामुळे नाखोन पाथोम प्रांतातील प्तेलाच्या गोदामाला आग लागली. तिने जाळपोळ केल्याची कबुली दिली आणि सांगितले की तिचा पर्यवेक्षक, पिपत उंगप्रापाकोर्न (६५ ) यानी त्रास दिला. त्यामुळे मी हा प्रकार केला.

सीसीटीव्ही फुटेजनुसार, ती गोदामाच्या आत जाताना व तिच्या हातात कागदाचा जळत तुकडा असल्याचे दिसले. डेल मेलने प्रकाशित केल्याप्रमाणे आणखी एक व्हिडिओ फुटेज, हजारो लिटर तेलाच्या टाक्या असलेल्या सिंगल-स्टोरी वेअरहाऊसमधील कंटेनरच्या वरच्या बाजूला ज्वाला भडकत असल्याचे दाखवले आहे.

टाक्यांमधील ज्वलनशील पदार्थामुळे आग वेगाने पसरली, ज्यामुळे £900,000 (रु. 9,04,46,378) चे नुकसान झाले. वृत्तानुसार, आगीत दहा घरेही खाक झाली आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी ४० हून अधिक अग्निशमन दलांनी चार तास प्रयत्न केले. ज्वलनशील तेल कालव्यात वाहून शेजारच्या निवासी वस्तीपर्यंत पोहोचू नये यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

रिपोर्टनुसार, मेजर जनरल चोमचाविन पुर्थाननॉन यांनी सांगितले की, या प्लांटला आग लागण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या नऊ वर्षांपासून ही महिला प्रापकोर्न ऑइलमध्ये काम करते. आरोपीने सांगितले की तिच्या मालकाकडे त्रास दिल्याची तक्रार केली होती. पण दाखल घेतली नाही. त्यामुळे तेलाचे गोदाम पेटविले.

In Thailand, a female employee set fire to an oil depot; Anger for not taking the complaint

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात