जपानमधील ओसाकामध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचा कहर, वैद्यकीय यंत्रणा कोलमडली, रुग्णालयांत बेडच नाहीत


एका बाजुला जपानमध्ये ऑ लिम्पिक स्पर्धा घेण्याची तयारी सुरू असताना ओसाका या शहरात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा कहर सुरू झाला आहे. रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. बेड आणि व्हेंटिलेटर शिल्लक नाहीत. आरोग्य यंत्रणा कोलमडून गेल्याचे म्हणत ऑ लिम्पिक स्पर्धा रद्द करण्याची मागणी डॉक्टरांनीच केली आहे. ओसाका हे जपानमधील ९० लाख लोकसंख्येचे शहर आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेत या शहरातील मृत्यूंची संख्या वाढली आहे. जपानमधील ७ टक्के लोकसंख्या असलेल्या या शहरात देशातील एकूण मृत्यूंच्या एक तृतियांश मृत्यू झाले आहेत.Fourth wave of corona in Osaka, Japan, medical system collapses, no hospital beds


विशेष प्रतिनिधी

ओसाका : एका बाजुला जपानमध्ये ऑ लिम्पिक स्पर्धा घेण्याची तयारी सुरू असताना ओसाका या शहरात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा कहर सुरू झाला आहे. रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

बेड आणि व्हेंटिलेटर शिल्लक नाहीत. आरोग्य यंत्रणा कोलमडून गेल्याचे म्हणत आॅलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याची मागणी डॉक्टरांनीच केली आहे.
ओसाका हे जपानमधील ९० लाख लोकसंख्येचे शहर आहे.



 

कोरोनाच्या चौथ्या लाटेत या शहरातील मृत्यूंची संख्या वाढली आहे. जपानमधील ७ टक्के लोकसंख्या असलेल्या या शहरात देशातील एकूण मृत्यूंच्या एक तृतियांश मृत्यू झाले आहेत.

जपानमधील अर्ध्याहून कमी आरोग्य कर्मचाºयांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. दोन महिन्यांवर ऑलिम्पिक स्पर्धा आल्या असताना ओसाकासारख्या शहरातील आरोग्य यंत्रणाच कोलमडून गेल्याचे आव्हान जपानसमोर आहे.

ओसाका येथील किंडाई युनिव्हर्सीटी हॉस्पीटलचे संचालक युजी तोहडा म्हणाले, संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच कोलमडून गेली आहे. अतिसंसर्गीत असलेल्या ब्रिटीश व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट झाला आहे. जपानमध्ये आत्तापर्यंत कोरोनाची मोठी लाट आली नव्हती.

परंतु, चौथी लाट जीवघेणी ठरत आहे. तीन महिन्यांपूर्वी आलेल्या लाटेच्या पाचपट रुग्ण चौथ्या लाटेमुळे बाधित झाले आहेत. मात्र, त्यातील १४ टक्के रुग्णांनाच हॉस्पीटलमध्ये जागा मिळू शकली आहे. बाकीच्यांना घरीच उपचार घ्यावे लागत आहे.

Fourth wave of corona in Osaka, Japan, medical system collapses, no hospital beds

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात