कामासाठी तरुण बाहेरगावी निघून गेल्याने इंग्लंडमधील गावेही ओस पडली आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये घरे कवडीमोल किंमतीत विकली जात आहे. वेल्स भागातील एक दोन खोल्यांचे घर केवळ १०३ रुपयांत विकले जाणार आहे. त्याचा लिलाव जाहीर करण्यात आला आहे.Even in England, the price of a two-room house is only 103 rupees
विशेष प्रतिनिधी
लंडन : कामासाठी तरुण बाहेरगावी निघून गेल्याने इंग्लंडमधील गावेही ओस पडली आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये घरे कवडीमोल किंमतीत विकली जात आहे. वेल्स भागातील एक दोन खोल्यांचे घर केवळ १०३ रुपयांत विकले जाणार आहे. त्याचा लिलाव जाहीर करण्यात आला आहे.
दोन खोल्यांचे घर ते ही इंग्लंडच्या प्रसिध्द भागात आणि किंमत फक्त १०३ रुपये! होय, हे खरे आहे. या घरात एकच प्रश्न आहे की त्याच्यामध्ये स्वयंपाक घर किंवा बाथरुम नाही. प्रसिध्द मॉरीस्टन या भागात हे घर आहे.
या घराला दोन दरवाजे असून त्याचबरोबर खासगी बागही आहे. हे घर दुमजली असून याठिकाणी फायरप्लेसपासून अनेक सुविधा आहेत. या घराचे नुतनीकरण केल्यास ते चांगलेच ऐसपैसही होऊ शकते.
कवडीमोल किंमतीत ही घरे विकण्यामागचे कारण म्हणजे इंग्लंडमधील अनेक गावे ओस पडली आहेत. गावातील तरुण रोजगाराच्या शोधासाठी बाहेर निघून गेले आहेत. केवळ ज्येष्ठ नागरिकच गावात राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी घरे विकायला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे घरे विकत घेण्यासाठीही कोणी नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App