‘आम्हाला ‘ब्लडी इंडियन्स’ म्हणणारे इंग्रज आता आमचा पार्श्वभाग चाटतात’


भारतावर दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांनी भारताला लुटूनच इंग्लंडी संपत्ती वाढवली. पण तरीही वंशवादाच्या, वर्चस्ववादाच्या गंडातून बहुसंख्य इंग्रज भारतीयांना नेहमीच प्रत्येक बाबतीत कमी लेखत आले. याच इंग्लंडचे क्रिकेटपटू आता इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल)मधल्या श्रीमंतीपुढे लाचार होताना दिसतात. नेमक्या याच मुद्यावरुन इंग्रजांच्या वंशभेदाचा बळी ठरलेल्या भारताचे माजी रणजीपटू, यष्टीरक्षक फारुख इंजिनिअर यांनी इंग्रजांवर झोंबणाऱ्या, तिखट शब्दात टीका केली आहे. We ‘bloody Indians’ to Britishers, Look at them now…they are licking our backsides-   Farokh Engineer blasted on how he tackled racism in England 


प्रतिनिधी

मुंबई : फारुख इंजिनिअर हे भारतीय क्रिकेटमधलं मोठं नाव. यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून त्यांनी एकेकाळी लक्षणीय कामगिरी केली. मुळचा मुंबईकर पारशी बाबा असलेल्या फारुख इंजिनिअर यांना त्यांच्या कारकिर्दीत इंग्लंडमधल्या वंशभेदाला कसे तोंड द्यावे लागले याची कहाणी सांगितली आहे.

1960 च्या दशकात इंजिनिअर लँकेशायर क्लबकडून काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये राहिले होते. त्यावेळी त्यांना भारतीय इंग्रजांकडून असल्यामुळे हीन वागणूक मिळाली होती. क्रिकेटच्या मैदानात उतरल्यानंतर प्रतिस्पर्ध्याची भीडभाड न बाळगता धाडसी खेळ करण्यासाठी इंजिनिअर प्रसिद्ध होते.



आताही त्यांनी त्यांच्या बेधडक स्वभावाला शोभणारी प्रतिक्रीया नोंदवली आहे. तीही भारताचा क्रिकेट संघ सध्या इंग्लडच्या दौऱ्यावर असताना. स्वतः भोगलेल्या भेदाच्या झळा आठवत फारुख इंजिनिअर म्हणाले की, इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी येणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना इंग्रज खेळाडू आणि प्रेक्षकांकडून वंशभेदाच्या कॉमेंट्स नेहमीच ऐकाव्या लागल्या. इंग्लंडचा माजी फलंदाज जॉफ्री बॉयकॉटने भारतीय खेळाडूंचा उल्लेख करण्यासाठी कधीच चांगले शब्द वापरले नाहीत. उलट तो भारतीयांची हेटाळणी करताना नेहमी ‘ब्लडी इंडियन्स’ म्हणायचा.

“कधी काळी आम्ही त्यांच्यासाठी ब्लडी इंडियन्स होतो. पण जेव्हापासून आयपीएल सुरु झाली तेव्हापासून ते सगळे आमचा पार्श्वभाग चाटू लागले आहेत,” अशा तिखट शब्दात इंजिनिअर उखडले आहेत. केवळ पैशांसाठी इंग्रज खेळाडू आमचे तळवे चाटतात हे पाहून मला गंमत वाटते. पण माझ्यासारखे लोक त्यांचे खरे रंगरुप काय होते हे जाणून आहेत.

आता त्यांनी अचानक त्यांचे स्वर बदलले आहेत. खेळण्यासाठी नाही मिळाले तरी टीव्हीवर झळकण्यासाठी का होईना काही महिन्यांसाठी भारतात जाऊन पैसा कमवण्यासाठी आता त्यांच्यासाठी भारत उत्तम देश बनला आहे, या शब्दात इंजिनिअर यांनी आजी-माजी इंग्रज क्रिकेटपटूंची मानसिकता व्यक्त केली आहे.

वंशवाद, वंशभेद हा इंग्लंडमधला सध्याचा एकदम हॉट विषय बनला आहे. त्याचे कारण ठरला आहे. इंग्लंडच्या संघात असणारा 27 वर्षीय वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन. रॉबिन्सनने 2012 आणि 2013 मध्ये वांशिक टिप्पण्या केल्या होत्या. अनेक इंग्रज खेळाडूंच्या अशा जुन्या वांशिक कॉमेंट्सवरुन लोक प्रश्न विचारु लागले आहेत.

इंजिनिअर यांनी या चर्चेत भर घातली आहे. इंजिनिअर म्हणाले की, मी जेव्हा पहिल्यांदा काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये आलो तेव्हा विचारलं गेलं, की हा भारतातून आलाय का. त्यानंतर मला वंशभेदाचा सामना करावा लागला. केवळ भारतातून आल्यानं मला ऐकवलं जायचं. खरं तर मी मूळ इंग्रजांपेक्षा चांगलं इंग्लिश बोलत असे. लवकरच त्यांच्या लक्षात आलं की माझ्याशी पंगा घेऊन उपयोग नाही.

कारण मी त्याच तडफेनं त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्त्युत्तर द्यायचो. एवढचं नव्हे तर मैदानातसुद्धा यष्टीरक्षण करताना आणि फलंदाजी करताना मी स्वतःला तिथं सिद्ध केलं. देशाचा राजदूत म्हणून मी भारताला क्रिकेटच्या नकाशावर स्थान मिळवून देण्यात वाटा उचलला याचा मला अभिमान वाटतो.

We ‘bloody Indians’ to Britishers, Look at them now…they are licking our backsides-   Farokh Engineer blasted on how he tackled racism in England 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात