लॉकडाऊनमुळे जीवाणूजन्य आजार घटले, कोट्यवधींचे वाचले प्राण ; अभ्यासातून स्पष्ट


वृत्तसंस्था

लंडन : कोरोनामुळे सारे जग लॉकडाऊनमध्ये कधी न कधी आले. त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. प्राणघातक अशा जीवाणूजन्य आजारांचा प्रसार कमी झाला. त्यामुळे कोट्यावधी लोकांचे प्राण वाचले आहेत. Covid Lockdowns Saved Millions Of Lives By Reducing Bacterial Infections Oxford University Led Study

ऑक्सफोर्ड विद्यापीठाने याबाबत 26 देशांतील लॉकडाऊनचा अभ्यास केला. त्यात ही माहिती उघड झाली. लॉकडाउनमुळे न्यूमोनिया, मेंदुज्वर आणि सेप्टिक (जखमेत पू होणे) सारख्या आजारांच्या रुग्णांची संख्या कमी होणाच्यी शक्यता आहे.



संसर्गजन्य रोगाचे तज्ज्ञ आणि क्राइस्टचर्चच्या ओटागो विद्यापीठाचे डीन प्रोफेसर डेव्हिड मर्डोक यांनी त्यांच्या अभ्यासातून ही माहिती दिली आहे.न्यूमोनिया, मेंदुज्वर यासारख्या आजारामुळे जगभरात अनेकांचे मृत्यू झाले आहेत.

विशेषत: मुले आणि वृद्धांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाप्रमाणे या आजारांचे जंतू देखील श्वसनमार्गाद्वारे शरीरात जातात.अभ्यासानुसार, २०१६ मध्ये जगभरात श्वसनाच्या विकारांचे ३३.६ कोटी रुग्ण आढळले आहेत.

२४ लाख जणांचा या आजारांमुळे मृत्यू झाला आहे. जानेवारी आणि मे २०२० मध्ये सर्वच देशांमध्ये या आजारांच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलेनत प्रत्येक देशात ६००० रुग्ण आढळले आहेत.

निर्बंधामुळे चार आठवड्यांतच न्यूमोनियाच्या रुग्णांची संख्या ६७ टक्क्यांनी कमी झाली. आठ आठवड्यापर्यंत अशीच स्थिती आहे. लोकांचा एकमेकांसोबत संपर्क कमी झाल्याने श्वसनाच्या जीवाणूंच्या संसर्गाचे प्रमाण कमी झाले, असे संशोधकांचे म्हणणे आहे.२६ देशांमधील राष्ट्रीय प्रयोगशाळांमधील माहितीचा अभ्यासकांनी अभ्यास केला. त्यावरुन त्यांनी कोरोना निर्बंधांचा अभ्यास केला होता.

Covid Lockdowns Saved Millions Of Lives By Reducing Bacterial Infections Oxford University Led Study

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात