भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसचे झाले नामकरण, डेल्टा आणि काप्पा नावाने ओळखला जाणार व्हायरस


भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या व्हेरिएंटला भारतीय व्हेरिएंट असे म्हणून विरोधक भारताची बदनामी करत आहेत. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)या कोरोनाचे डेल्टा आणि काप्पा असे नामकरण केले आहे. कोणत्याही देशाच्या नावाने कोरोना व्हायरस ओळखल जाणे योग्य नसल्याचेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे.Corona virus found in India will be renamed as Delta and Kappa virus.


विशेष प्रतिनिधी

जिनीव्हा : भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या व्हेरिएंटला भारतीय व्हेरिएंट असे म्हणून विरोधक भारताची बदनामी करत आहेत. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)या कोरोनाचे डेल्टा आणि काप्पा असे नामकरण केले आहे.

कोणत्याही देशाच्या नावाने कोरोना व्हायरस ओळखल जाणे योग्य नसल्याचेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे.ग्रीक अल्फाबेटवरून या व्हायरसचे नामकरण करण्यात आले आहे. भारतामध्ये पहिल्यांदा सापडलेल्या कोरोना व्हायरसला डेल्टा असे म्हटले जाणार आहे.



त्यापूर्वीच्या व्हायरसला काप्पा असे नाव देण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार बी.१.६१७.१ या व्हेरिएंटला काप्पा असे म्हटले जाणार आहे. बी.१.६१७.२ या व्हेरिएंटला डेल्टा असे नाव दिले आहे. हे दोन्ही विषाणू पहिल्यांदा आॅक्टोबर २०२० मध्ये सापडले होते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक विभागाच्या प्रमुख डॉ. मारीया व्हॅन केरकोव्ह म्हणाल्या की प्रत्येकाने कोरोना व्हायरसचे शास्त्रीय नावच वापरले पाहिजे. त्याचा संशोधनासाठी उपयोग होतो. त्याचबरोबर कोणत्याही देशाचे नाव कोरोना व्हेरिएंटला देऊन बदनामी करणे योग्य नाही.

Corona virus found in India will be renamed as Delta and Kappa virus.

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात