विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लशीचा बूस्टर डोस देण्यास येथील रोगनियंत्रक विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे अमेरिकेत लवकरच लसीकरणाचा नवा टप्पा सुरु होणार आहे.US will give booster dose for elders
या अंतर्गत ६५ वर्षांवरील व्यक्ती, नर्सिंग होममध्ये राहणारे आणि संवेदनशील प्रकृती असलेल्या ५० ते ६४ या वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. फायझर लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी हा तिसरा डोस दिला जाणार आहे.
अमेरिकेत अद्यापही फक्त ५५ टक्के नागरिकांचेच संपूर्ण लसीकरण झाले असल्याने एकही डोस न घेतलेल्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्याचा सल्लाही रोगनियंत्रक विभागाने दिला आहे.
सर्वांचे लसीकरण झाल्याशिवाय काही जणांना बूस्टर डोस देऊनही संसर्ग नियंत्रणात येणार नाही, असे या विभागाने स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App