विशेष प्रतिनिधी
काबूल : जागतिक व्यापार संघटनेच्या दोन इमारती विमाने धडकवून पडल्यानंतर आणि पेंटागॉनवर हवाई हल्ले चढवून अमेरिकेला डिवचणाऱ्या अफगाणी तालिबानी दहशतवाद्यांचा संपूर्ण खात्मा करण्यात अमेरिकेला अपयश आले आहे. आता त्यांचा संरक्षणाच्या दृष्टीने खात्मा करण्याची नैसर्गिक जबाबदारी भारतावर आली आहे.US failure to eradicate Afghan terrorists; India’s responsibility increased
जगात अव्वल सुरक्षा असलेल्या अमेरिकेवर तालिबानी दहशतवाद्यांनी ११ सप्टेंबर २०११ रोजी विमाननेच हत्यारे बनवली व हवाई हल्ले चढविले होते. त्यानंतर अफगाणिस्तानात अमेरिकेने तालिबानचा खात्मा करण्यासाठी जोरदार मोहीम उघडली होती. तालिबानवर हवाई हल्ले चढविले. तब्बल २० वर्षे अमेरिकेचे सैन्य तैनात होते.
अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. तालिबानचा म्होरक्या ओसामा बिन लादेन यांचा खात्मा केला. परंतु ‘ सुंभ जळाला पण पिंड कायम ‘या उक्तीप्रमाणे अफगाणिस्तानातील तालिबानी दहशतवाद्यांचा संपूर्ण खात्मा करण्यात अमेरिका अयशस्वी ठरली आहे.
आता या महिन्या अखेरीस अमेरिकी सैन्य अमेरिकेत परतत असताना तालिबानी दहशतवादी अफगाणिस्तान पुन्हा ताब्यात घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आता राजधानी काबूल ताब्यात घेण्याचे राहिले आहे. साठ टक्क्यांपेक्षा अधिक भूभाग तालिबान्यांनी बळकावला आहे. काबूल शहर आता ३० दिवसात तालिबानी बळकावण्याचा धोका आहे.
अमेरिकेला अफगाण मोहिमेचा काहीच फायदा झाला नसल्याचे आता स्पष्ट होत आहे. इराकप्रमाणे अफगाणिस्तान भकास करून अमेरिका तुम्ही आणि तुमचा देश स्मसे सांगून आता काढता पाय घेत आहे.
तालिबानींचा भारताला अधिक धोका
कट्टर, धर्मांध तालिबानी दहशतवादी भारतासाठी धोकादायक आहेत. सीमेवरील पाकिस्तान, बांगलादेश ही मुस्लिम राष्ट्रे आहेत. पण, बहुसंख्य हिंदू लोकसंख्या असलेला भारत त्यांचे लक्ष्य असू शकतो. ‘पाहुण्याच्या काठीने साप ‘मारण्याचे दिवस आता सरले आहेत. भारतावर तालिबान्यांनी वक्र दृष्टी पडण्यापूर्वी या दहशवाद्यांवर कठोर कारवाई सुरू करावी.
प्रसंगी हवाई हल्ले चढवून त्यांचा खात्मा करावा. अफगाण सरकारने भारताकडे हवाई हल्ल्याचे संरक्षण मागितले आहे. ते भारताचे हित लक्षात घेऊन पुरवण्याची गरज आहे. अफगाणिस्तानचा अंतर्गत मामला म्हणून दुर्लक्ष करणे धोक्याला आमंत्रण आहे. भारतीय विमानाचे काही वर्षांपूर्वी झालेले अपहरण हे उदाहरण पुरेसे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App