हॉकीपटू विवेक सागरचे ब्राँझ मेडल पाहताच यशोधरा राजे यांना आनंदाश्रू अनावर…!!


वृत्तसंस्था

भोपाळ : टोकियो ऑलिंपिक 2020 मध्ये भारताला हॉकीमध्ये तब्बल 41 वर्षांनंतर ब्र ब्राँझ पदक मिळाले. मध्य प्रदेशातील हॉकीपटू विवेक सागर या पदक विजेत्या टीमचा सदस्य आहे. विवेकचे आज भोपाळ विमानतळावर मध्य प्रदेश सरकारतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. त्यावेळी विवेकच्या गळ्यातील ब्राँझपदक पाहून मध्य प्रदेशच्या क्रीडामंत्री यशोधरा राजे सिंधियांना आनंदाश्रू अनावर झाले.MP sports minister Yashodhara Raje gets emotional while receiving hockey bronze medalist Vivek Sagar

विवेक सागर हा यशोधरा राजे यांनी बांधलेल्या हॉकी अकॅडमीचा खेळाडू आहे. आपल्या अकॅडमीतील खेळाडूने एवढी प्रचंड झेप घ्यावी, याचा यशोधरा राजे यांना अत्यंत अभिमान वाटला. त्या स्वतः विमानतळावर त्याचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होत्या. त्यावेळी विवेकच्या गळ्यातील ब्राँझपदक त्यांनी मस्तकाला लावले.



मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी विवेकला मध्यप्रदेश पोलिस सेवेची डीएसपी रँकिंग पोस्ट ऑफर केली आहे. त्याचबरोबर एक कोटीचे पारितोषिकही त्याला प्रदान केले आहे.

यशोधरा राजे यांनी सिंधिया यांनी 2006 मध्ये हॉकी अकॅडमी बांधली आहे. या हॉकी अकॅडमीत शेकडो शेकडो खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रेनिंग घेत आहेत. विवेक सागर हा एका शिक्षकाचा मुलगा या अकॅडमीत ट्रेनिंग घेऊन ऑलिंपियन बनला आहे. याचा यशोधरा राजे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

MP sports minister Yashodhara Raje gets emotional while receiving hockey bronze medalist Vivek Sagar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात