तालिबानने केली १०० अफगाणी नागरिकांची हत्या, स्पिन बोल्डक परिसरात भीषण हल्ले


स्पिन बोल्दक परिसरात असलेल्या घरांवर तालिबान्यांनी हल्ला केल्याची माहिती देशाच्या गृह मंत्रालयाने दिली आहे.  त्यात तालिबानने 100 नागरिकांचा बळी घेतला आहे. The Taliban have killed 100 civilians in Afghanistan

विशेष प्रतिनिधी 

अफगाणिस्तान मध्ये धक्कादायक बातमी घडली आहे. तालिबानने अफगाणिस्तान देशातील 100 नागरीकांचा बळी घेतला आहे. स्पिन बोल्दक परिसरात असलेल्या घरांवर तालिबान्यांनी हल्ला केल्याची माहिती देशाच्या गृह मंत्रालयाने दिली आहे.  त्यात तालिबानने 100 नागरिकांचा बळी घेतला आहे.

स्पिन बोल्दक शहराबाबत :- स्पिन बोल्दक हे सीमावर्ती शहर आहे, जे पाकिस्तानला लागून आहे.  हे कंधारमधील एक प्रमुख धोरणात्मक ठिकाण आहे.  अलीकडेच या जागेवर तालिबान्यांनी कब्जा केला होता.  सीमापार तालिबान्यांनी ताब्यात घेतल्यानंतर अफगाण सुरक्षा दलाने ही जागा परत मिळवण्यासाठी लढा दिला होता.

अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती  अम्रुल्लाह सालेह यांनी याच शहराबाबत नुकतेच ट्विट केले आणि पाकिस्तानवर तालिबान्यांना मदत केल्याचा आरोप केला.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाण सुरक्षा दलाला धमकी दिली आहे की त्यांनी स्पिन बोल्दक भागातून तालिबान्यांना हटवण्याचा प्रयत्न केल्यास पाकिस्तान त्यांच्याविरूद्ध जवाबी कारवाई करेल.  पाकिस्तानच्या हवाई दल या भागात तालिबान्यांना हवाई सहाय्य देत असल्याचेही सालेह यांनी सांगितले.

यापूर्वी काही तास आधी अशीही बातमी आली होती की तालिबान्यांनी लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे.  पाकिस्तानी पत्रकार मोहिबुल्ला खान यांनी ट्विटद्वारे क्षेपणास्त्र चाचणीचा व्हिडिओ सामायिक केला आणि सांगितले की तालिबान्यांनी अल-फताह म्हणजेच तालिबान टेस्ट्स लाँग रेंज बॅलिस्टिक मिसाईल या नावाच्या एका क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटसमवेत असलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘तालिबान्यांनी नवीन लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अल-फताहाची यशस्वी चाचणी घेतली आहे.’

The Taliban have killed 100 civilians in Afghanistan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात