पुण्यातील कोरोनाचा संसर्ग दर तीन टक्यांपेक्षा कमी, गेल्या आठवड्यापासून दिलासादायक चित्र


विशेष प्रतिनिधी

पुणे: गेल्या आठवड्यापासून पुण्यात दिलासादायक चित्र आहे.कोरोनाचा संसर्ग दर (पॉझिटिव्ही रेट) सर्वात कमी तीन टक्के झाला आहे.शहरात मागील सहा महिन्यांतील सर्वात कमी संसर्गाच्या दराची नोंद दोन ते नऊ ऑगस्ट या कालावधीत झाली, त्यानंतर सलग दुसऱ्या आठवडय़ातही पुणे शहरातील कोरोना संसर्गाचा दर तीन टक्क्यांच्या खालीच राहिल्याचे दिसून आले आहे.Corona infection rate in Pune is less than three per cent, a reassuring picture from last week

६ व ९ ऑगस्ट रोजी संसर्ग दर अनुक्रमे १.८९ व १.८८ एवढा होता. तर १० रोजी २.९६, ११ रोजी २.६१ तर १२ ऑगस्ट रोजी हा दर २.३८ एवढा होता. ही घट दिलासादायक असली तरी कोरोना प्रतिबंधात्मक सर्व निर्बंध हटवण्यात आल्याने आता नागरिकांनी मास्क, लसीकरण, शारीरिक अंतर हे नियम पाळून दैनंदिन व्यवहार करणे आवश्यक आहे.



शहरात होणाऱ्या दर १०० चाचण्यांमागे आढळणाऱ्या बाधित रुग्णांचे प्रमाण दर सहा ते १२ ऑगस्ट दरम्यान सातत्याने तीन टक्क्यांहून कमी राहिल्याचे दिसून आले आहे. मार्च २०२० पासून पुणे शहर हे राज्यातील करोना संसर्गाचे केद्र ठरले होते. फेब्रुवारी-मार्च २०२१ पासून शहरातील रुग्णसंख्येने दुसऱ्या लाटेचे रूप धारण केले. त्या पाश्र्वभूमीवर संसर्गाच्या दरातील ही घट दिलासादायक आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२१ पासून तब्बल महिनाभर तीव्र स्वरूपात रुग्णवाढ झाल्यानंतर एप्रिल २०२१ पासून दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या काहीशी ओसरण्यास सुरुवात झाली, तरी संसर्गाचा दर २५ टक्के एवढा होता. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत त्यात घट होऊन तो २० टक्के पर्यंत खाली आला. मे महिन्याच्या अखेरीस मात्र शहरातील संसर्गाचा दर वेगाने कमी होण्यास सुरुवात झाली.

त्यानंतर जून महिन्यात दैनंदिन रुग्णसंख्या दर सातत्याने सहा ते आठ टक्के एवढा खाली आला. जुलै महिन्यातही तेच चित्र कायम राहिले. ऑगस्टमध्ये त्यात आणखी दिलासादायक घट होताना दिसत आहे, मात्र शहरातील टाळेबंदीचे र्निबध शिथिल झाल्याने ही घट कायम राखण्याचे आव्हान आहे.

Corona infection rate in Pune is less than three per cent, a reassuring picture from last week

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात