अमेरिकेने पाकिस्तानकडून 900 मिलियन डॉलर्सची शस्त्रे खरेदी करून युक्रेनला पाठवली, बदल्यात पाकला IMF कडून मिळाले कर्ज

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : अनेक महिन्यांच्या बैठकीनंतर पाकिस्तानला जुलै 2023 मध्ये IMFकडून 3 अब्ज डॉलरचे बेलआउट पॅकेज मिळाले. आता अमेरिकन मीडिया हाऊस द इंटरसेप्टने दावा केला आहे की, हे कर्ज मिळवण्यात अमेरिकेची महत्त्वाची भूमिका होती.US buys $900 million worth of arms from Pakistan and sends them to Ukraine, in exchange for Pakistan’s IMF loan

इंटरसेप्टच्या रिपोर्टनुसार, IMF कडून कर्ज मिळवण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेसोबत शस्त्रास्त्रांचा गुप्त करार करावा लागला. अमेरिकेने पाकिस्तानकडून शस्त्रे घेतली आणि रशियाशी युद्ध करणाऱ्या युक्रेनला दिली.



इंटरसेप्टने लिहिले आहे की, एप्रिल 2022 मध्ये पाकिस्तानच्या लष्कराने अमेरिकेच्या इशाऱ्यावरून इम्रान खान यांना सत्तेवरून हटवले. तेव्हापासून पाकिस्तान अमेरिकेचा उपयुक्त समर्थक म्हणून पुढे आला आहे. त्या बदल्यात अमेरिकेने पाकिस्तानला आयएमएफकडून कर्ज मिळवून देण्यासाठी मदत केली.

यामुळे पाकिस्तान दिवाळखोर होण्यापासून वाचला आणि सरकारला निवडणुका पुढे ढकलण्यास मदत झाली. मिडल ईस्ट इन्स्टिट्यूटचे आरिफ रफिक यांनी इंटरसेप्टला सांगितले की, पाकिस्तानची लोकशाही युक्रेन युद्धाचा बळी ठरली आहे.

पाकिस्तानला शस्त्रे विकून 900 मिलियन डॉलर्स मिळाले

पाकिस्तान युद्धात वापरल्या जाणार्‍या तोफखाना आणि शेल्सच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. त्याच वेळी, युक्रेनमध्ये वर्षभर चाललेल्या युद्धामुळे या शस्त्रांचा मोठा तुटवडा नोंदवला गेला आहे. ओपन सोर्स वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये बनवलेली शस्त्रे युक्रेनकडून युद्धात वापरली जात आहेत.

मात्र, अमेरिकेने किंवा पाकिस्तानने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. इंटरसेप्टला 2022-23 मध्ये पाकिस्तानने विकलेल्या शस्त्रास्त्रांची कागदपत्रे मिळाली आहेत. त्यावर अमेरिकेच्या ब्रिगेडियर जनरलच्याही स्वाक्षऱ्या आहेत. अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील हा करार ग्लोबल मिलिटरी प्रॉडक्ट्सने केला होता.

द इंटरसेप्टच्या तपासणीनुसार, 23 मे 2023 रोजी पाकिस्तानचे राजदूत मसूद खान यांनी वॉशिंग्टन डीसीला भेट दिली. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे सहायक सचिव डोनाल्ड लू यांची भेट घेतली. युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवण्यासाठी पाकिस्तानचे मन वळवणे हा त्याचा उद्देश होता. जेणेकरून IMFच्या नजरेत पाकिस्तानची आर्थिक स्थिती थोडी चांगली दिसू शकेल.

याच बैठकीत पाकिस्तानमधील अमेरिकेचे राजदूत डोनाल्ड ब्लॉम आणि तत्कालीन अर्थमंत्री इशाक दार यांच्यात शस्त्रास्त्र करार करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. लू यांनी 23 मेच्या बैठकीत खान यांना सांगितले की अमेरिकेने पाकिस्तानच्या शस्त्रास्त्रांसाठी पैसे देण्यास मान्यता दिली आहे. त्यांच्यात झालेल्या गुप्त कराराची माहितीही ते आयएमएफला सांगतील.

लू म्हणाले की, पाकिस्तानींना असा विश्वास आहे की शस्त्रास्त्रांमधून 900 मिलियन डॉलर मिळतील. यामुळे IMF कडून सुमारे दोन अब्ज डॉलर्सच्या आवश्यक आर्थिक मदतीतील उरलेली तफावत भरून काढण्यास मदत होईल. खरे तर कर्ज देण्यापूर्वी आयएमएफने पाकिस्तानपुढे अट ठेवली होती की, त्याला इतर कोणत्याही देशाकडून किमान 2 अब्ज डॉलर्सचे कर्ज घ्यावे लागेल आणि ते आपल्या परकीय गंगाजळीत हमी रक्कम म्हणून जमा करावे लागेल.

US buys $900 million worth of arms from Pakistan and sends them to Ukraine, in exchange for Pakistan’s IMF loan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात