बुधवारीव्यापक चर्चेनंतर ते मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान काल मोदी मंत्रिमंडळाने महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा यांसारख्या निवडून आलेल्या संस्थांमध्ये 33 टक्के महिला आरक्षणाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. एबीपी न्यूजने हे वृत्त दिले आहे. Modi cabinet approves womens reservation bill signs to be presented in new parliament today
महिला आरक्षण विधेयक आज (19 सप्टेंबर) नव्या संसदेत मांडले जाऊ शकते. दुपारी एक नंतर ते लोकसभेत मांडले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर बुधवारी (20 सप्टेंबर) व्यापक चर्चेनंतर ते मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
तत्पूर्वी, संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होण्यापूर्वी, सोमवारी (18 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संसदेचे अधिवेशन लहान असले तरी वेळेनुसार ते खूप मोठे, मौल्यवान आणि ऐतिहासिक निर्णयांनी भरलेले आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर एका पोस्टद्वारे महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले, “महिला आरक्षणाची मागणी पूर्ण करण्याचे नैतिक धैर्य फक्त मोदी सरकारमध्ये होते, जे मंत्रिमंडळाच्या मंजुरीने सिद्ध झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारचे अभिनंदन.” मात्र पटेल यांनी नंतर त्यांची पोस्ट हटवल्याचे दिसून आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more