पंतप्रधान मोदी संविधानाची प्रत हातात घेऊन नव्या संसद भवनापर्यंत पायी जाणार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आजपासून नव्या संसदेत देशाचे संसदीय कामकाज सुरू होणार आहे. आजपासून गणेश चतुर्थीच्या दिवशी ही नवीन इमारतही श्री गणेशाला समर्पित करण्यात येणार आहे. वास्तविक, सध्या संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा पहिला दिवस काल जुन्या संसद भवनात झाला, तर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच आजपासून नवीन इमारतीतून कामकाज होणार आहे. या खास दिवसाचे संपूर्ण वेळापत्रकही समोर आले आहे.With the arrival of Ganaraya the work will start from today in the new hall of Parliament
सर्वप्रथम, आज सकाळी 9.30 वाजता जुन्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलसमोर फोटो सेशन होणार आहे. यानंतर नवीन संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून विशेष कार्यक्रम सुरू होईल. यामध्ये संसदेच्या ऐतिहासिक वारशाचाही उल्लेख करण्यात येणार असून 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनविण्याची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, पीयूष गोयल, मनेका गांधी, शिबुसोरेन आणि मनमोहन सिंग सेंट्रल हॉलमध्ये बोलणार आहेत.
मेनका गांधी या सेंट्रल हॉलमध्ये बोलणार आहेत कारण त्या लोकसभेत सर्वाधिक काळ खासदार म्हणून राहिल्या आहेत. तर मनमोहन सिंग हे राज्यसभेवर सर्वाधिक काळ खासदार राहिलेले आहेत. ते या नात्याने बोलतील. याशिवाय लोकसभा आणि राज्यसभेत मिळून शिबुसोरेन हे सर्वाधिक काळ खासदार आहेत, त्यामुळे ते सेंट्रल हॉलमध्ये बोलणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 11 ते दुपारी 12.35 पर्यंत चालणार आहे. यानंतर नवीन संसद भवनात लोकसभेचे कामकाज 1.15 वाजता सुरू होईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more