विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : भविष्यातील जैविक संकटांबद्दल आणि महामारीबद्दल आताच गांभिर्याने पाहिले नाही तर परिस्थिती आणखी उद्ध्वस्ततेकडे नेऊ शकत अशी भीती मायक्रॉसॉफ्टचे संस्थापक-अध्यक्ष बिल गेटस यांनी व्यक्त केली आहे.The situation could escalate further, fears Bill Gates
बिल आणि मेलानिया गेट्स फाऊंडेशन’नं ‘कोलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेडनेस इनोव्हेशन’ कडे १५० दशलक्ष डॉलर देणगी सोपवली आहे. यवा पैशाचा वापर कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी तसेच भविष्यात संभाव्य साथीच्या रोगांसाठी पूर्वतयारी करण्यासाठी करण्यात येईल.
गेटस म्हणाले जग वेगानं विकसित होणाऱ्या विषाणूच्या आव्हानाला तोंड देत आहे. अशा परिस्थितीत जीवरक्षक उपकरणांची गरज आता तातडीची राहिलेली नाही. लस निर्माण करण्यासाठीचा कालावधी १०० दिवसांहून कसा कमी करता येईल, याकडे लक्ष दिले जाणार आहे.
संशोधन आणि विकासामध्ये गुंतवणूक केल्यामुळे आपलं जीवन वाचवले जाऊ शकतं आणि सर्वात भयंकर स्थिती उत्पन्न होण्यापासून रोखलं जाऊ शकतं हे आम्ही गेल्या २० वर्षांत शिकलोय. भविष्यात काही संभाव्य महामारींमुळे करोना विषाणूपेक्षाही भयंकर असे मृत्यूचं प्रमाण दिसून येऊ शकते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App