पाकिस्तान, तुर्कस्तान, चीनला सत्तारोहणासाठी तालिबानचे निमंत्रण


काबूल – अफगाणिस्तानात सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु असून काही देशांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाल्याचे समजते. Taliban will invite china, Pakistan and 6 nations for govt. formation

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, तालिबानने सरकार स्थापनेची तयारी सुरु केली असून यावेळी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाकिस्तान, तुर्कस्तान, कतार, रशिया, चीन आणि इराण या सहा देशांना त्यांनी निमंत्रण पाठविले आहे.



तालिबानला अद्यापही कोणत्या देशाने मान्यता दिलेली नाही. हे सहा देश या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यास त्यांची तालिबानी राजवटीला अधिकृत मान्यता असल्याचे मानले जाणार आहे.

तालिबानचा प्रवक्ता झबिबउल्ला मुजाहिद याने पत्रकार परिषद घेत, पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळविल्याचा दावा केला. या दाव्यानुसार, संपूर्ण अफगाणिस्तानवर आता तालिबानचा ताबा असून आतापर्यंत अजिंक्य असलेल्या पंजशीरवरही त्यांची वर्चस्व मिळविले आहे.

लवकरच आम्ही ‘इस्लामिक अफगाणिस्तान अमिराती’चे (आयईए) सरकार स्थापन करू, असे मुजाहिद याने सांगितले. तसेच, सरकार स्थापनेनंतर अफगाणिस्तानच्या राज्यघटनेत सुधारणा केली जाईल किंवा ती नव्याने तयार केली जाईल, असेही त्याने स्पष्ट केले.

Taliban will invite china, Pakistan and 6 nations for govt. formation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात