बांगलादेश न्यायालयाबाहेर वकिलाच्या हत्येवरही केली आहे टिप्पणी
विशेष प्रतिनिधी
ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. इस्कॉन मंदिराचे पुजारी चिन्मय कृष्ण दास यांची अटक अन्यायकारक असल्याचे त्यांनी वर्णन केले आहे. तसेच युनूस सरकारने चिन्मय दासची तात्काळ सुटका करावी, असेही त्या म्हणाल्या.
बांगलादेश न्यायालयाबाहेर वकिलाच्या हत्येवर हसीना म्हणाल्या की, या हत्येमध्ये सहभागी असलेल्या लोकांना लवकरात लवकर शोधून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. वकिलाच्या हत्येमध्ये सामील असलेल्यांना त्यांनी दहशतवादी संबोधले आणि बांगलादेशातील जनतेला दहशतवाद आणि अतिरेकाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले Sheikh Hasinas
sharad pawar मास्टर माईंड + जरांगेंचे नेहमीच माध्यमांमध्ये “मास्टर स्ट्रोक”; पण ऐनवेळी अवसानघातातून बाउंड्री वर कॅच आऊट!!
काय म्हणाल्या शेख हसीना?
अवामी लीगने शेख हसीना यांचे वक्तव्य ट्विटरवर पोस्ट केले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘सनातन धर्माच्या एका सर्वोच्च नेत्याला अन्यायकारकरित्या अटक करण्यात आली आहे, त्यांची तत्काळ सुटका करण्यात यावी. चितगावमध्ये मंदिरे जाळण्यात आली. मशिदी, मंदिरे, चर्च, मठ आणि अहमदिया समुदायाच्या घरांवर यापूर्वी हल्ले झाले आहेत, तोडफोड झाली आहे, लुटली गेली आहे आणि आग लावली गेली आहे. धार्मिक स्वातंत्र्य आणि सर्व समाजातील लोकांच्या जीवित आणि मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करणे आवश्यक आहे .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App