अमेरिकेच्या निर्बंधाच्या इशाऱ्यानंतरही ब्रम्हास्त्र भारताच्या शस्त्रसंभारात, रशियाने पुरविली अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली


विशेष प्रतिनिधी

दुबई: अमेरिकेने दिलेल्या निर्बंधाच्या इशाऱ्याला झुगारून भारताने ब्रम्हास्त्र म्हणविल्या जाणाऱ्या एस -400 क्षेपणास्त्र प्रणाली आपल्या शस्त्रसंभारात सामील केली आहे. रशियाने ही प्रणाली भारताला पुरविली आहे.चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.Russia’s state-of-the-art missile system supplied by Russia to India’s arsenal, despite US sanctions

रशियाच्या फेडरल सर्व्हिस फॉर मिलिटरी टेक्निकल कोऑपरेशनचे संचालक दिमित्री शुगाएव यांनी दुबई एअर शोमध्ये याची घोषणा केली. भारताला एस-400 प्रणालीचा पुरवठा सुरू झाला असून तो वेळेवर करण्यात येत आहे, असे शुगाएव म्हणाले. ही अत्याधुनिक रशियन संरक्षण प्रणाली घेतली तर भारताला निबंर्धांना सामोरे जावे लागू शकते, असा इशारा अमेरिकेने दिला होता.



भारताच्या आधी ही संरक्षण यंत्रणा तुर्की आणि चीनच्या सैन्यात दाखल झाली आहे. चीनने तिबेटमध्येही ही यंत्रणा तैनात केली आहे. भारत आणि रशियात २०१८ मध्ये एस-400 पुरवण्यासाठी करार केला होता. आफ्रिका आणि पश्चिम आशियातील आणखी ७ देश ही संरक्षण यंत्रणा घेण्यासाठी बोलणी करत आहेत, असे रशियाच्या सरकारी मालकीच्या शस्त्रास्त्र कंपनी रोसोबोरोनएक्सपोर्टचे प्रमुख अलेक्झांडर मिखीव यांनी आॅगस्टच्या सुरवातीला स्पुतनिक न्यूजला सांगितले होते.

रशियाच्या एस-400 च्या जागी भारताने आपली हवाई संरक्षण प्रणाली पॅट्रियट खरेदी करावी, अशी अमेरिकेची इच्छा आहे. एस-400 समोर अमेरिकन यंत्रणा कुठेही टिकू शकत नाही. यामुळेच भारत सरकारने अमेरिकेची हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्यास नकार दिला आहे.

रशियाच्या यंत्रणा खरेदी करण्यापासून ते मागे हटणार नाही आणि रशियाशी केलेल्या करारानुसार पुढे जाणार, असे भारताने स्पष्ट केले आहे. भारताच्या या भूमिकेमुळे आता अमेरिकेच्या निर्बंधाचा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाला अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू, असल्याचे म्हटले आहे.

अत्याधुनिक एस-400 च्या माध्यमातून रशियाला अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांशी संबंधित रहस्ये कळू शकतात, अशी भीती अमेरिकेला आहे. नाटोचा सदस्य तुकीर्देखील अमेरिकेच्या निबंर्धांपासून वाचू शकला नाही.

Russia’s state-of-the-art missile system supplied by Russia to India’s arsenal, despite US sanctions

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात