PHOTOS : बालपणी देश सोडावा लागला, दुसऱ्या महायुद्धात गाजवले शौर्य, असे झाले प्रिन्स फिलिप यांचे सम्राज्ञीशी लग्न

Prince Philip Death Watch His Profile In Photos

Prince Philip Death : महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलिप यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले. रॉयल फॅमिलीने ट्विट करून सांगितले की, त्यांनी विंडसर कॅसल येथे अखेरचा श्वास घेतला. प्रिन्स फिलिप यांचा जन्म 10 जून 1921 रोजी कॉर्फू या ग्रीक बेटावर झाला होता. फेब्रुवारी महिन्यात प्रिन्स फिलिप यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्याच्यावर संसर्ग आणि हृदय व रक्तवाहिन्याशी संबंधित आजारांवर उपचार करण्यात आले. नंतर मार्च महिन्यात त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. तब्बल 73 वर्षे महाराणीबरोबर संसार करणारे प्रिन्स फिलिप हे आपल्या आधुनिक विचारसरणीसाठी प्रसिद्ध होते. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल… Prince Philip Death see His Profile In Photos

Prince Philip Death Watch His Profile In Photos

प्रिन्स फिलिप ग्लुक्सबर्ग राजघराण्यातील सदस्य होते. त्यांचा जन्म ग्रीक आणि डॅनिश राजघराण्यात झाला होता. बालपणी त्यांच्या कुटुंबाला देशातून परागंदा व्हावे लागले. त्यांचे शिक्षण फ्रान्स, जर्मनी आणि युनायटेड किंगडम येथे झाले. यानंतर प्रिन्स फिलिप वयाच्या 18व्या वर्षी ब्रिटिश रॉयल नेव्हीमध्ये दाखल झाले.

Prince Philip Death Watch His Profile In Photos

1397 मध्ये त्यांची पहिल्यांदाच राजकुमारी एलिझाबेथ यांच्याशी भेट झाली. आणि यानंतर दोघांमध्ये पत्रांद्वारे संवाद सुरू झाला. दुसर्‍या महायुद्धात त्यांनी नौसेनेच्या भूमध्य सागर आणि प्रशांत महासागरातील तुकड्यांमध्ये सेवा देऊन शौर्य गाजवले.

Prince Philip Death Watch His Profile In Photos

महायुद्धानंतर सहाव्या जॉर्जनी फिलिप यांना आपली लाडकी कन्या एलिझाबेथशी लग्न करण्याची परवानगी दिली. 20 नोव्हेंबर 1949 रोजी त्यांनी एलिझाबेथ यांच्याशी लग्न केले. लग्नाआधी महाराजा जॉर्ज सहावे यांनी त्यांचा ब्रिटिश रॉयल टायटल देऊन सन्मान केला. ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांना त्यांच्या कारकिर्दीत देशातील प्रदीर्घ राज्यकर्त्यांपैकी सर्वात मेहनती सदस्य म्हणून ओळखले जायचे.

Prince Philip Death Watch His Profile In Photos

बकिंगघम पॅलेसच्या म्हणण्यानुसार, ऑगस्ट 2017 मध्ये वयाच्या 96 व्या वर्षी प्रिन्स फिलिप यांनी राणीच्या पूर्ण पाठिंब्याने अधिकृत शाही कर्तव्यांमधून निवृत्ती घेतली होती.

Prince Philip Death Watch His Profile In Photos

त्यांच्या अधिकृत सेवानिवृत्तीनंतरही प्रिन्स फिलिप रविवारीच्या कार्यक्रमांमध्ये राणी एलिझाबेथ यांच्यासोबत दिसायचे. प्रिन्स फिलिप आणि क्वीन एलिझाबेथ यांनी नुकताच 20 नोव्हेंबर 2020 रोजी त्यांच्या लग्नाचा 73वा वाढदिवस साजरा केला होता.

Prince Philip Death see His Profile In Photos

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*