अमेरिकी नौदलाची विनापरवानगी भारतीय सागरी हद्दीत मोहीम, मुत्सद्दी संबंधांवर परिणामांची शक्यता

Unauthorized US naval operations in Indian maritime borders, likely to affect diplomatic relations

US naval operations in Indian maritime borders : अमेरिकेच्या नौदलाद्वारे भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रात एक मोहीम केल्याची बातमी समोर आहे. अमेरिकी नौदलाने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. यूएस नौदलाच्या वृत्तानुसार, यूएसएस जॉन पॉल जोन्सने (डीडीजी) 53) लक्षद्वीप समूहाच्या पश्चिमेला 130 समुद्री मैलावर मोहीम केली. Unauthorized US naval operations in Indian maritime borders, likely to affect diplomatic relations


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अमेरिकेच्या नौदलाद्वारे भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रात एक मोहीम केल्याची बातमी समोर आहे. अमेरिकी नौदलाने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. यूएस नौदलाच्या वृत्तानुसार, यूएसएस जॉन पॉल जोन्सने (डीडीजी) 53) लक्षद्वीप समूहाच्या पश्चिमेला 130 समुद्री मैलावर मोहीम केली.

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार भारताची पूर्व संमती न घेता ही कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकेच्या नौदलाने म्हटले आहे. अमेरिकेची ही कारवाई भारताच्या सागरी सुरक्षा धोरणाच्या विरोधात आहे. यूएस नेव्हीची सातवी फ्लीट सर्वात मोठी आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोणत्याही किनारपट्टीच्या देशाचे आर्थिक क्षेत्र हे किनारपट्टीपासून 200 समुद्री मैलांच्या म्हणजेच 370 किमी अंतरावर मर्यादित आहे. अशा परिस्थितीत या भागात लष्करी कारवायांसाठी भारताची परवानगी आवश्यक आहे. दरम्यान, अशीच कृती अंदमान निकोबारमध्ये चिनी जहाजाने सन 2019 मध्ये केली होती.

दरम्यान, आतापर्यंत नौसेना आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तथापि, यूएस नौदलाच्या वतीने असे म्हटले गेले आहे की, आम्ही रुटीन आणि नियमितरीत्या फ्रीडम ऑफ नेव्हिगेशनचे काम करतो. आम्ही हे यापूर्वीही केले असून भविष्यातही करत राहू, असे अमेरिकी नौदलाच्या वतीने सांगण्यात आले.

Unauthorized US naval operations in Indian maritime borders, likely to affect diplomatic relations

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात