कोणत्याही आंदोलनादरम्यान रस्ता अडवून ठेवता कामा नये, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

road cannot be blocked during protest, a big decision of the Supreme Court

Supreme Court : सुप्रीम कोर्टाने धरणे-आंदोलनामुळे रस्ता बंद असल्याने सामान्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल दाखल झालेल्या एका याचिकेवर मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, सार्वजनिक जागा आणि रस्त्यांवर धरणे आंदोलन करून तो ब्लॉक केला जाऊ शकत नाही. वास्तविक, नोएडाच्या एका महिलेच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, सार्वजनिक जागा, रस्त्यांना अडवले जाता कामा नये. जेणेकरून दळणवळण सुरळीत राहू शकेल. रस्त्यांवर वाहतूक कोणत्याही अडथळ्यांशिवाय व्हायला पाहिजे, असेही सुप्रीम कोर्ट म्हणाले. road cannot be blocked during protest, a big decision of the Supreme Court


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने धरणे-आंदोलनामुळे रस्ता बंद असल्याने सामान्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल दाखल झालेल्या एका याचिकेवर मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, सार्वजनिक जागा आणि रस्त्यांवर धरणे आंदोलन करून तो ब्लॉक केला जाऊ शकत नाही. वास्तविक, नोएडाच्या एका महिलेच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, सार्वजनिक जागा, रस्त्यांना अडवले जाता कामा नये. जेणेकरून दळणवळण सुरळीत राहू शकेल. रस्त्यांवर वाहतूक कोणत्याही अडथळ्यांशिवाय व्हायला पाहिजे, असेही सुप्रीम कोर्ट म्हणाले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडा ते दिल्ली या मार्गावर लावलेले बॅरिकेड हटवण्याची मागणी होत आहे. नोएडा ते दिल्ली रोडवेवरील बॅरिकेडमुळे सामान्य नागरिकांना येण्यासाठी प्रचंड त्रास झाला आहे. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालय म्हटले की, रस्ते अडवू नये. तर दिल्ली सरकारच्या वतीने तुषार मेहता यांनी पुढील आठवड्यात या खटल्याची सुनावणी करण्याची मागणी केली आहे.

खरंतर नोएडामध्ये राहणाऱ्या एका महिलेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून असा दावा केला आहे की, दिल्ली व नोएडामध्ये बॅरिकेडमुळे तिला दिल्लीला जाण्यासाठी 20 मिनिटांऐवजी दोन तासांचा प्रवास करावा लागतो. याचिकाकर्त्या मोनिका अग्रवाल यांनी दावा केला आहे की, त्या नोएडामध्ये राहतात आणि आपल्या नोकरीच्या संदर्भात त्यांना दिल्लीला जावे लागते.

road cannot be blocked during protest, a big decision of the Supreme Court

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती