दक्षिण आफ्रिकी व्हेरिएंटवर कमी प्रभावी अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस, देशाने थांबवला वापर; सीरमनेही रिफंड केले पैसे

AstraZeneca vaccine Less effective on the South African variant, country stopped use; Serum also refunded the money

AstraZeneca vaccine : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दक्षिण आफ्रिकेला कोविड-19 वरील लसीच्या 5 लाख डोसचे पैसे परत दिले आहेत. खरं तर दक्षिण आफ्रिकेने ही लस न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतील कोरोना व्हेरिएंटवर ही लस कमी प्रभावी असल्याचे आढळल्याने असा निर्णय घेण्यात आला आहे. AstraZeneca vaccine Less effective on the South African variant, country stopped use; Serum also refunded the money


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दक्षिण आफ्रिकेला कोविड-19 वरील लसीच्या 5 लाख डोसचे पैसे परत दिले आहेत. खरं तर दक्षिण आफ्रिकेने ही लस न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतील कोरोना व्हेरिएंटवर ही लस कमी प्रभावी असल्याचे आढळल्याने असा निर्णय घेण्यात आला आहे.

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेला यापूर्वीच देण्यात आलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे दहा लाख डोस आफ्रिकन युनियनच्या इतर देशांमध्ये विकण्यात आले आहेत. गुरुवारी एका पत्रकार परिषदेत दक्षिण आफ्रिकेचे आरोग्यमंत्री ज्वेली मिखाईज यांनी सांगितले की, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उर्वरित 500,000 डोससाठीचे पैसे आम्हाला पूर्णपणे परत केले आहेत, हे पैसे आमच्या बँक खात्यातही जमा झाले आहेत.

इतर आफ्रिकन देशांमध्ये उपयुक्त ठरतेय लस

आरोग्यमंत्री म्हणाले की, “ही लस न घेण्याचा आम्ही निर्णय घेतलाय कारण ही लस दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या प्रकारावर तेवढी प्रभावी नाही. यामुळे डोस घेणे सुरू ठेवणे व्यर्थ आहे. ते म्हणाले की, दक्षिण आफ्रिकन नागरिकांना चिंता वाटतेय की, ही लस आता नष्ट होईल, परंतु आम्हाला हे सांगायचे आहे की, ही लस इतर देशांना देण्यात आली आहे. ते म्हणाले की, आम्हाला पूर्वी मिळालेले एक लाख डोस आफ्रिकन युनियनच्या इतर देशांना विकले आहेत.

मिखाइस म्हणाले की दक्षिण आफ्रिका अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या प्रयत्नांना पाठिंबा देत राहील आणि जर सीरम संस्थेने दक्षिण आफ्रिकेच्या व्हेरिएंटवर प्रभावी लस आणली तर आम्ही नक्कीच पुन्हा त्यांच्याशी व्यवहार करू.

AstraZeneca vaccine Less effective on the South African variant, country stopped use; Serum also refunded the money

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात