Jammu-Kashmir Encounter : Two Terrorist killed in clashes in Tral By Security Forces

Jammu-Kashmir Encounter : त्रालमध्ये चकमक, सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

पुलवामा जिल्ह्यात अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. वृत्तसंस्था एएनआयनुसार, अवंतीपोरातील त्रालमध्ये नायबग भागात अतिरेकी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ही चकमक अद्यापही सुरू आहे. काश्मीर पोलिसांनी सांगितले की, पोलीस आणि सुरक्षा दलाकडून ही कारवाई सुरू आहे. Jammu-Kashmir Encounter : Two Terrorist killed in clashes in Tral By Security Forces


वृत्तसंस्था

पुलवामा : पुलवामा जिल्ह्यात अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. वृत्तसंस्था एएनआयनुसार, अवंतीपोरातील त्रालमध्ये नायबग भागात अतिरेकी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ही चकमक अद्यापही सुरू आहे. काश्मीर पोलिसांनी सांगितले की, पोलीस आणि सुरक्षा दलाकडून ही कारवाई सुरू आहे.

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात गुरुवारी अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी झाली होती. यात एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाला. यासह प्रत्युत्तराच्या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले होते. शोपियानच्या बाबा मोहल्ल्यात अतिरेकी उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या भागाला वेढा घालून शोध मोहीम सुरू केली.

गोळीबारात एक जवान जखमी

यादरम्यान अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला, त्यामुळे चकमकीला सुरुवात झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या गोळीबारात एक जवान जखमी झाला. सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. या भागात चार अतिरेकी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Jammu-Kashmir Encounter : Two Terrorist killed in clashes in Tral By Security Forces

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*