नियमावलीची ऐशीतैशी : दादरच्या भाजीमंडईत उसळली अलोट गर्दी, कोरोनाची भीतीच उरली नाही

huge crowd gathered in Dadar's vegetable market amid Corona crisis in Mumbai

Corona crisis in Mumbai : राज्यात कोरोना महामारीने थैमान घातलेले असतानाही मुंबईकरांना त्याची भीतीच उरली नसल्याचे दिसून येत आहे. दादरच्या भाजीमंडईत असलेली अलोट गर्दी लोकं आता पहिल्यासारखे सतर्क नाहीत, हेच दिसून येते. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाबाधित आढळत आहेत. मुंबईत दररोज रुग्णसंख्येचे नवनवे रेकॉर्ड मोडले जात आहेत. तरीही लोकांनी कोरोनाची नियमावली धाब्यावर बसवून खरेदीला प्राधान्य दिले आहे. मागच्या 24 तासांत एकट्या मुंबईत 8,938 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 23 मृत्यू झाले आहेत. huge crowd gathered in Dadar’s vegetable market amid Corona crisis in Mumbai


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात कोरोना महामारीने थैमान घातलेले असतानाही मुंबईकरांना त्याची भीतीच उरली नसल्याचे दिसून येत आहे. दादरच्या भाजीमंडईत असलेली अलोट गर्दी लोकं आता पहिल्यासारखे सतर्क नाहीत, हेच दिसून येते. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाबाधित आढळत आहेत. मुंबईत दररोज रुग्णसंख्येचे नवनवे रेकॉर्ड मोडले जात आहेत. तरीही लोकांनी कोरोनाची नियमावली धाब्यावर बसवून खरेदीला प्राधान्य दिले आहे. मागच्या 24 तासांत एकट्या मुंबईत 8,938 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 23 मृत्यू झाले आहेत.

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 56286 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 376 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात 36130 जण बरे होऊ घरी गेले आहेत. सध्या राज्यात 5,21,317 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण 26,49,757 रुग्ण बरे झालेले आहेत. तर 57,028 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 32,29,547 पर्यंत पोहोचली आहे.

मुंबई पोलिसांकडून नवी नियमावली

कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच नवी कोरोना गाइडलाइन जारी केली आहे. यानुसार शहरात अनेक ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे. याद्वारे कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्याची प्रशासनाची अपेक्षा आहे.

  • वीकेंड लॉकडाऊन.
  • समुद्र किनारे 30 एप्रिलपर्यंत बंद.
  • सार्वजनिक उद्याने आणि बगिच्यांमध्ये सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत 5 पेक्षा जास्त जणांना जायला मनाई.
  • दुकान, बाजार आणि मॉल पूर्णपणे बंद.
  • अत्यावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहतील.
  • अत्यावश्यक सेवेची वगळून इतर सर्व खासगी कार्यालये बंद राहतील.
  • टीव्ही शूटिंग आणि चित्रपटांसाठी अटीशर्थींसह परवानगी.
  • सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी.
  • सिनेमा, थिएटर, ऑडिटोरियम, आर्केड, वॉटर पार्क, क्लब, स्विमिंग पूल, जिम परिसर बंद राहतील.

huge crowd gathered in Dadar’s vegetable market amid Corona crisis in Mumbai

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात