मुंबईमध्ये धावणार आधुनिक डबलडेकर बस, बेस्टचा १०० बस खरेदीचा निर्णय; प्रवासी सुखावले


वृत्तसंस्था

मुंबई : मुंबई शहरात लवकरच अत्याधुनिक डबलडेकर बस धावणार आहेत. एकीकडे आवडत्या जुन्या डबलडेकर बस सेवेतून काढल्या जात असताना ही नवी बातमी मुंबईकरांसाठी आनंदाची ठरली आहे. Modern double decker bus running in Mumbai



बेस्ट 100 नव्या कोऱ्या आणि आधुनिक डबलडेकर बस खरेदी करणार आहे. डबलडेकर बसची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे मुंबईकरांना चुटपुट लागली आहे. एकेकाळी 120 डबलडेकर बस धावत होत्या. साधारण 15 वर्षे सेवा बजाविल्यानंतर त्या मोडीत काढल्या जात आहेत. आता 51 डबलडेकर शिल्लक आहेत. त्यापैकी 10 बस महिन्यात भंगारात निघणार आहेत. त्यामुळे केवळ 41 बस शिल्लक राहणार आहेत.

नवीन 100 डबलडेकर दृष्टीक्षेपात

  • बेस्टने नोव्हेंबर 2020 मध्ये आधुनिक 100 डबलडेकर बससाठी निविदा काढली.
  • बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. दोन दरवाजे, दोन जिने, सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.
  • नवीन डबलडेकर बसमध्ये दोन्ही बाजूस दरवाजे असून ते स्वयंचलित असतील.
  • बस आणि प्रवासी सुरक्षेकरिता सीसीटीव्ही कॅमेरेही असणार आहेत.
  • या नव्या बस ‘भारत-6’ श्रेणी इंजिनाच्या आहेत.
  • बसना स्वयंचलित गिअर असतील

Modern double decker bus running in Mumbai

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात