लसीच्या तुटवड्यावरून राहुल गांधींचा पीएम मोदींवर निशाणा, म्हणाले- लसींचा अभाव गंभीर समस्या, ‘उत्सव’ नव्हे!

Rahul Gandhi Criticizes PM Modi over vaccine shortage

vaccine shortage : कोरोना लसीचा तुटवडा होण्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारत राहुल गांधी ट्वीट करून म्हणाले की, आपल्या देशवासीयांना धोक्यात टाकून लसीची निर्यात योग्य आहे का? यादरम्यान त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली राहुल गांधी म्हणाले की, वाढत्या कोरोना संकटामध्ये लसीचा अभाव ही एक गंभीर समस्या आहे, उत्सव नव्हे. Rahul Gandhi Criticizes PM Modi over vaccine shortage


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना लसीचा तुटवडा होण्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारत राहुल गांधी ट्वीट करून म्हणाले की, आपल्या देशवासीयांना धोक्यात टाकून लसीची निर्यात योग्य आहे का? यादरम्यान त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली राहुल गांधी म्हणाले की, वाढत्या कोरोना संकटामध्ये लसीचा अभाव ही एक गंभीर समस्या आहे, उत्सव नव्हे.

राहुल गांधी म्हणाले, “वाढत्या कोरोना संकटात लसीचा अभाव ही एक अतिगंभीर समस्या आहे, ‘उत्सव’ नाही. आपल्या देशातील नागरिकांना धोक्यात टाकून केंद्र सरकारने लसीची निर्यात करणे योग्य आहे का? केंद्राने सर्व राज्यांना कोणताही भेदभाव न करता मदत करावी. आपल्या सर्वांना एकत्रितपणे या महामारीचा पराभव करावा लागेल.’

राज्यांनी उचलला होत vaccine shortage चा मुद्दा

दरम्यान, कोरोना लसीच्या कमतरतेबद्दल देशातील अनेक राज्यांनी केंद्र सरकारला माहिती दिली होती. राज्यांनी दिलेल्या या माहितीनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी या लसीसंदर्भात केंद्राची बाजू मांडली होती.

यावर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले की, “आता ही भीती संपवूया. कोरोना लसीचे 9 कोटी पेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. राज्यांमध्ये 4.3 कोटींचा साठा आहे. तुटवड्याचा प्रश्न आलाच कुठून? आम्ही सतत निगराणी करत आहोत, पुरवठाही वाढवत आहोत.”

Rahul Gandhi Criticizes PM Modi over vaccine shortage

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण