राज्यात तीन आठवड्याचा कडक लॉकडाऊन लागणार : वडेट्टीवार

वृत्तसंस्था

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आता कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी हा लॉकडाऊन होऊ शकतो. याबाबत आज मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते आणि सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली.Three-week tightening in the state Lockdown: Vadettiwar

या बैठकीत लॉकडाऊन बाबत चर्चा झाली आहे. कोरोना वाढत चालल्याने सध्या 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घातले आहेत.मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन आवश्यक आहे.आज मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत हाच मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आहे. येणाऱ्या तीन-चार दिवसात त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल, असं वडेट्टीवार म्हणाले.

तीन आठवड्यांचा हा लॉकडाउन कडक हवा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच या कालावधीत फक्त भाजी आणि अत्यावश्यक सेवासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा द्यावी अशी मागणीही केली आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

एका दिवसांत 56 हजारावर लोक बाधित 

राज्यात गुरुवारी दिवसभरात 56 हजार 286 कोरोना रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत आहे.

Three-week tightening in the state Lockdown: Vadettiwar

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*