अँटिंलियासमोर स्फोटके ठेवल्यानंतर सचिन वाझे काहीतरी मोठे प्लॅनिंग करीत होता; एनआयएच्या सूत्रांचा धक्कादायक खुलासा


वृत्तसंस्था

मुंबई :  अँटिलिया स्फोटके प्रकरणाच्या तारा खूप खोलवर विस्तारलेल्या आहेत. कारण सचिन वाझे हा अँटिलिया समोरे स्फोटके भरलेली गाडी पार्क केल्यानंतर काहीतरी मोठे प्लॅनिंग करत होता, अशी माहिती मिळाल्याचा धक्कादायक खुलासा एनआयएच्या सूत्रांनी केला आहे.Sachin Waze was planning another big act after explosive planting near Antilia in Mumbai, says NIA sources

सचिन वाझेला एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांनी लॉजिस्टिक सपोर्ट दिला का, याचा तपास एनआयए करीत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचे स्टेटमेंट साक्षीदार म्हणून नोंदविण्यात येत आहे, संशयित म्हणून नाही, असा महत्त्वपूर्ण खुलासाही एनआयएच्या सूत्रांनी केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.



एनआयए सारख्या केंद्रीय तपास यंत्रणेकडूनच एवढ्या गंभीर स्वरूपाचे खुलासे झाल्यानंतर मुंबईत काही मोठी घटना घडणार होती, या संशयाला बळकटी मिळाली आहे. त्याचबरोबर आणखी बरेच मोठे मासे संशयाच्या घेऱ्याबरोबरच तपासाच्या घेऱ्यात येणार असल्याचेही स्पष्ट होत आहे.

मुकेश अंबानींचे निवासस्थान अँटिलिया समोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर त्यासंदर्भात बऱ्याच क्राइम थिअरीज मांडण्यात आल्या. यात दहशतवादाचा अँगल आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएची टीम तपासाच्या कामाला लागली. त्यांनी गेल्या १५ दिवसांपासून सचिन वाझेंसह अनेकांचे जबाब नोंदविले आहेत. त्याचे कोणतेही खुलासे एनआयएने आत्तापर्यंत केलेले नाहीत.

पण आजच सूत्रांच्या हवाल्याने सचिन वाझे काहीतरी मोठे प्लॅनिंग करीत होता. तेही अँटिलियासमोर स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी पार्क केल्यानंतर… असा खुलासा केल्याने या प्रकरणाचे धागोदोरे बरेच खोलवर असल्याचेही स्पष्ट होत आहे.

Sachin Waze was planning another big act after explosive planting near Antilia in Mumbai, says NIA sources

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात