Prince Philip Death : ब्रिटनच्या राजघराण्यावर शोककळा, राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलिप यांचे निधन

Prince Philip Death Queen Elizabeth's husband Prince Philip Passes Away

Prince Philip Death : महाराणी एलिझाबेथ यांच्या पतीच्या निधनानंतर ब्रिटनच्या राजघराण्यावर शोककळा पसरली आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलिप यांचे वयाच्या 99व्या वर्षी निधन झाले. द रॉयल फॅमिलीने ट्वीट करून सांगितले की, विंड्सर कॅसलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रिन्स फिलिप यांचा जन्म 10 जून 1921 रोजी कोर्फू या ग्रीक द्वीपावर झाला होता.


विशेष प्रतिनिधी

लंडन : महाराणी एलिझाबेथ यांच्या पतीच्या निधनानंतर ब्रिटनच्या राजघराण्यावर शोककळा पसरली आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलिप यांचे वयाच्या 99व्या वर्षी निधन झाले. द रॉयल फॅमिलीने ट्वीट करून सांगितले की, विंड्सर कॅसलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रिन्स फिलिप यांचा जन्म 10 जून 1921 रोजी कोर्फू या ग्रीक द्वीपावर झाला होता.

फेब्रुवारी महिन्यात प्रिन्स फिलिप यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर संसर्ग आणि हृदयासंबंधित उपचार करण्यात आले. यानंतर मार्च महिन्यात महाराणी एलिझबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलिप (99) यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. प्रिन्स फिलिप यांच्या पश्चात चार मुले, आठ नातू आणि पाच पणतू आहेत.

प्रिन्स फिलिप यांच्याबद्दल…

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलीप यांनी 1947 मध्ये लग्न केले होते. ब्रिटीश राजघराण्यात या जोडप्याने हे सर्वात जास्त काळ सेवा त्यांनी सेवा दिली. तब्बल 70 वर्षे ड्यूक पदावर राहणारे प्रिन्स फिलीप हे ब्रिटीश राजघराण्यातील एकमेव व्यक्ती होत. ब्रिटिश रॉयल नेव्हीतून कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या प्रिन्स फिलीप यांनी महाराणी एलिझाबेथ यांच्याबरोबर 70 वर्षांहून जास्त काळ संसार केला. रुढीवाद नाकारून आधुनिकतेचा पुरस्कार करणारे म्हणून त्यांची ओळख होती. राजघराण्याशी संबंधित असूनही विशिष्ट प्रथांना उघडपणे विरोध करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. प्रिन्स फिलिप यांच्या निधनामुळे महिनाभर दुखवटा पाळला जाणार आहे.

Prince Philip Death Queen Elizabeth’s husband Prince Philip Passes Away

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात