पडद्यामागून लॉकडाऊन: अजित पवारही प्रशासनासमाेर झुकले; पुण्यात निर्बंधच निर्बंध! मिनी लाॅकडाऊनच लागू


कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुण्यात शनिवारपासून (दि. ३) सात दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. दिवसभर जमावबंदी लागू असणार आहे. हाॅटेल, बार, माॅल, धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. पीएमपी बससेवा बंद राहणार आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुण्यात शनिवारपासून (दि. ३) सात दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. दिवसभर जमावबंदी लागू असणार आहे. हाॅटेल, बार, माॅल, धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. पीएमपी बससेवा बंद राहणार आहे.

पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोनाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या वेळी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला.अजित पवार म्हणाले, पुण्यात मागील आठवड्यापेक्षा गंभीर परिस्थिती आहे. बेडच उपलब्ध झाले नाही तर काय करायचे? एखाद्या घरात कोरोना रुग्ण असेल तरी घरातील लोक गावभर फिरतात. संख्या आवाक्याबाहेर गेली तर अजित पवार यांना फोन केला तरी बेड मिळायचे नाही. काही हाॅस्पिटल पूर्णपणे काेराेनासाठी ठेवा. नाॅन कोविड हाॅस्पिटलची यादीही जाहीर करा. आरोग्य यंत्रणेवर, पोलिसांवर ताण असून प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.

विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, लोकांना त्रास होऊ नये म्हणून मध्यम मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये नियम कडक केले जाणार आहेत. होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या तपासणीवर भर देण्यात येणार आहे. त्यांची ब्लड टेस्ट करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल. खासगी रुग्णालयांच्या बिलांचे ॲाडिट पुन्हा सुरू केले जाईल. पॅाझिटिव्हिटी २७% वरून ३२% वर गेला आहे. आठवड्याचा ग्रोथ रेट हाच राहिला तर दिवसाला ९ हजार रुग्ण सापडतील. हॉस्पिटल बेडसंदर्भात काल बैठक झाली. काही रुग्णालये १००% कोविड हॅास्पिटल करण्याची वेळ येऊ शकते.

पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे म्हणाले, चेक पोस्ट, पेट्रोलिंग सुरू करणार आहोत. खासगी कार्यालयांवर काही बंदी नाही. आधीप्रमाणेच सुरू राहणार असून शाळा, कॉलेज बंद राहणार आहे. पुण्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी राहणार आहे. शहरातील हॉटेलमध्ये सायंकाळी ६ पर्यंत अन्नपदार्थ मिळतील, पण त्यानंतर अॅपद्वारे ऑर्डर स्वीकारल्या जाणार आहे.

लसीकरणाबाबत बोलताना राव म्हणाले, पुण्यात सर्वात जास्त लसीकरण सुरू आहे. शंभर दिवसांत लसीकरण पूर्ण करण्यासाठी मिशन १०० डेज सुरू करण्यात येणार आहे. मंडई आणि मार्केट यार्ड सुरू राहणार आहे. पण ग्राहकांना सुरक्षित अंतर ठेवून खरेदी करावी लागणार आहे. गार्डन आणि जिम सकाळच्या वेळेत सुरू राहणार आहे.

अत्यावश्यक गोष्टी सोडून सायंकाळी ६:०० ते सकाळी ६:०० सर्व गाेष्टी बंद राहणार.


लाॅकडाऊनची नियमावली पुढीलप्रमाणे:

दिवसा जमावबंदी. रात्री संचारबंदी, सर्व धार्मिक स्थळे बंद, उद्याने सकाळी सुरू राहणार. लग्न, अंतिम संस्कार सोडून सर्व कार्यक्रम बंद. हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल पुढील ७ दिवसांसाठी बंद, होम डिलिव्हरी मात्र सुरू राहणार. पीएमपीएमएलची बससेवा सात दिवसांसाठी बंद. लग्नसमारंभात ५० पेक्षा अधिक लोक चालणार नाही, अंत्यविधीसाठी २० लोकांचीच परवानगी. सार्वजनिक उद्याने, बागबगीचे फक्त सकाळीच सुरू, आठवडा बाजार सात दिवस बंद. शनिवारपासून सर्व निर्णयांची अंमलबजावणी होणार. शाळा, कॉलेज ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार. मात्र परीक्षा वेळेत होणार


 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती