विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अफगाणिस्तानात तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तेथे अडकून पडलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सक्रीय झाले आहेत. त्यांनी यासंदर्भात अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी संवाद केला.पूर्वाश्रमीचे गुप्तहेर असलेले डोवाल यांना अफगणिस्थानची चांगली माहिती आहे.National Security Adviser Ajit Doval is active in helping those stranded in Afghanistan
पाकिस्तानात अनेक वर्षे गुप्तहेर म्हणून काम केल्याने त्यांना तालीबानचीही माहिती आहे. दहशतवाद्यांनी भारतीय विमान अफगणिस्थानात पळून नेले होते. त्यावेळीही वाटाघाटीसाठी ते अफगणिस्थानात गेले होते.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनीही एकमेकांशी संवाद साधला. सोमवारी या दोन्ही नेत्यांदरम्यान अफगाणिस्तानातील सद्य परिस्थितीसंबंधी चर्चा झाली. अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर जगातील विविध देशांनी तिथे असणारे आपले नागरिक सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.
अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात केल्यानंतर भारत सरकारने तेथून भारतीय नागरिकांना सुरक्षित देशात परत आणण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी सकाळी भारतीय हवाई दलाचे विमान 120 भारतीयांना घेऊन गुजरातच्या जामनगर येथे उतरलं. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने उड्डाण केले होते.
भारतीय हवाई दलाच्या विमानातून 120 भारतीय नागरिकांना घेऊन काबूल येथून विमान आज सकाळी भारताकडे रवाना झाले होते. गुजरातमधील जामनगर विमानतळावर हे विमान उतरलं. मायदेशी परत आणले गेलेले सर्व अफगाणिस्तानातील भारतीय राजदूत कार्यालयाचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी होते. याशिवाय भारतीय पत्रकारांना देखील माघारी करण्यात आलं आहे
गुजरातच्या जामनगर येथे या विमानातून मायदेशी परतलेल्या नागरिकांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.अफगाणिस्तानातून परत आलेल्या लोकांना हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आलं. तिथून बस द्वारे त्यांना पुढे पाठवण्यात आले. यावेळी लोकांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.
काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील परिस्थिती बिघडत चालली असल्यामुळे सोमवारी विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. मात्र, अमेरिकी सैन्य दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मंगळवारी पहाटेपासून विमानतळ सुरू झालं. यानंतर भारतीय विमानाने तिथून उडाण केलं. भारतीय हवाई दलाच्या विमानाचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App