वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : अमेरिकन पत्रकार आणि सीएनएन वृत्तवाहिनीच्या इंटरनॅशनल अँकर क्रिस्टिनी एमॅनपोर यांनी हिजाब घालायला नकार दिला म्हणून इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी त्यांना टीव्ही इंटरव्यू नाकारल्याची बातमी समोर आली आहे. स्वतः क्रिस्टिनी एमॅनपोर यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे. Iranian president refuses TV interview after American journalist refuses to wear hijab in US
इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कला आले आहेत. या दौऱ्यातच इराणमधील हिजाब वादापासून अनेक मुद्द्यांवर त्यांची मुलाखत घेण्याचे नियोजन सीएनएन वृत्तवाहिनीच्या इंटरनॅशनल अँकर क्रिस्टिनी एमॅनपोर यांनी केले होते. मुलाखतीची नियोजित वेळही ठरली होती. परंतु आयत्या वेळी अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या सहाय्यकाने क्रिस्टिनी यांना टीव्ही इंटरव्यू दरम्यान हेड स्कार्फ घालण्याची सूचना केली. इराणच्या अध्यक्षांचा इंटरव्यू आहे. सध्या मोहरमचा महिना सुरू आहे.
इराणमध्ये महिलांना हिजाब – हेड्स स्कार्फ घालणे आवश्यक आहे. त्यामुळे हेड स्कार्फ घालूनच आपण अध्यक्षांचा इंटरव्यू घ्यावा, अशी सूचना होती. परंतु आपण अमेरिकेत आहात. येथे कोणताही कायदा अथवा परंपरा हेड स्कार्फ घालण्याचे बंधन घालत नाही. आत्तापर्यंत जेवढ्या इराणच्या अध्यक्षांचा इंटरव्यू घेतला आहे तेव्हा आपण हेड्स्कार्फ घातले नसल्याचे असे क्रिस्टिनी एमॅनपोर यांनी संबंधितांच्या लक्षात आणून दिले. परंतु तरी देखील इराणच्या अध्यक्षांचे सहाय्यक आपला मुद्दा पुढे रेटत राहिले. अखेरीस अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हा इंटरव्यू 40 मिनिटांनंतर रद्द करण्यात आला.
या संदर्भातला एक फोटो क्रिस्टीनी यांनी आपल्या ट्विटर हँडल वर शेअर केला असून न झालेल्या इंटरव्यूचे सगळे तपशील त्याबरोबर लिहिले आहेत. इराणमध्ये हिजाबचा वाद सध्या जोरात सुरू आहे. ठिकठिकाणी महिलांनी हिजाब जाळून निदर्शने केली आहेत. इतकेच नाही, तर हिजाब विरोधी महिला कार्यकर्ती म्हासा अमिनी हिचा कोठडीत मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष इब्राहिम रईस यांना विविध प्रश्न विचारण्याची क्रिस्टिनी यांची तयारी होती. प्रश्नांचे नियोजन अध्यक्षांना कळविण्यात आले होते. परंतु केवळ हेड स्कार्फ अर्थात हिजाबच्या मुद्द्यावरच ते अडून राहिल्याने अखेरीस संबंधित टीव्ही इंटरव्यू रद्द करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App