Iran Oil Pipeline Blast: इराणमध्ये मोठी दुर्घटना, तेलाच्या पाइपलाइनमध्ये झाला भीषण स्फोट


बुधवारी इराणच्या तेल पाइपलाइनमध्ये स्फोट झाला. ही घटना देशाच्या दक्षिण भागात घडली आहे. आतापर्यंत जीवित व वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. याप्रकरणी इराणच्या तसनीम वृत्तसंस्थेने सांगितले की, पाइपलाइनची पायाभूत सुविधा खूप जुनी झाल्याने हा अपघात झाला. स्फोटानंतर आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले, असे एजन्सीने सांगितले. यावरून स्फोट किती मोठा होता, हे लक्षात येते. Iran oil pipeline hit by explosion in southern part of country says reports


वृत्तसंस्था

तेहरान : बुधवारी इराणच्या तेल पाइपलाइनमध्ये स्फोट झाला. ही घटना देशाच्या दक्षिण भागात घडली आहे. आतापर्यंत जीवित व वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. याप्रकरणी इराणच्या तसनीम वृत्तसंस्थेने सांगितले की, पाइपलाइनची पायाभूत सुविधा खूप जुनी झाल्याने हा अपघात झाला. स्फोटानंतर आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले, असे एजन्सीने सांगितले. यावरून स्फोट किती मोठा होता, हे लक्षात येते.

या घटनेचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये आगीचे मोठे लोळ दिसत आहेत. तेल समृद्ध प्रांत खुजेस्तानमधील एका स्थानिक अधिकाऱ्याने सरकारी माध्यमांना सांगितले की, “अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.” आग आता आटोक्यात आली आहे. इराणमध्ये अशी घटना पहिल्यांदाच घडत आहे असे नाही तर याआधीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत. इराणमध्ये गेल्या 12 महिन्यांत आगीच्या आणि स्फोटांच्या अनेक घटना घडल्या आहेत.



तेल टँकरवरील हल्ला उधळला

दोन आठवड्यांपूर्वी असे वृत्त आले होते की, इराणच्या नौदलाने त्यांच्या तेल टँकरवर केलेला हल्ला हाणून पाडला होता. एडनच्या आखाताकडे जाणाऱ्या तेलाच्या टँकरवर चाच्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर टँकरवर असलेल्या इराणच्या नौदलाच्या पथकाची चाच्यांसोबत चकमक झाली. दोन्ही बाजूंनी शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. घटनेच्या वेळी हे जहाज बाब अल-मंदेब सामुद्रधुनीतून एडनच्या आखातासाठी जात होते.

Iran oil pipeline hit by explosion in southern part of country says reports

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात