वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांच्या मोहिमेने (निवडणूक संघ) दावा केला आहे की त्यांचे अंतर्गत संभाषण, नियोजनाशी संबंधित माहिती आणि कागदपत्रे हॅक करण्यात आली आहेत. मोहिमेनुसार ही हॅकिंगची घटना इराणी हॅकर्सनी घडवून आणली आहे.
अमेरिकन न्यूज वेबसाइट पॉलिटिकोने शनिवारी सांगितले की ट्रम्प यांच्या प्रचार कार्यक्रमाशी संबंधित वैयक्तिक कागदपत्रे ईमेलद्वारे पाठवण्यात आली आहेत. यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार वेन्स यांच्याबाबत पक्षाच्या संशोधनाशी संबंधित माहितीचाही समावेश आहे.
ट्रम्प यांच्या प्रचाराशी संबंधित प्रवक्त्याने बीबीसीला सांगितले की, 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप करण्याच्या उद्देशाने ही कागदपत्रे अमेरिकेच्या शत्रू देशाने चोरली आहेत. न्यूज वेबसाइट पॉलिटिकोने या कागदपत्रांची पडताळणी केल्याचा दावा केला आहे.
Paris olympics : भारताचा खेळाडूंवर 470 कोटी खर्च, माध्यमांनी काढला खुसपटी अर्थ; पण विकसित देश खर्च किती करतात??
विधान- ट्रम्प यांना रोखण्याचे षड़यंत्र रचले
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचे प्रवक्ते स्टीव्हन चेउंग म्हणाले की, इराणला ट्रम्प यांना पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्यापासून रोखायचे आहे. स्टीव्हन यांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प पुन्हा सत्तेत आले तर ते इराणच्या दहशतवादी कारवाया थांबवतील, जसे त्यांनी मागील कार्यकाळात केले होते.
रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार जेडी वेन्स यांच्या निवडीशी हँकिंगची वेळ निगडित असल्याचे स्टीव्हन यांनी सांगितले. पॉलिटिको या न्यूज वेबसाइटने 22 जुलै रोजी एक मेल मिळाल्याचे वृत्त दिले आहे. या मेलमध्ये 271 पानांच्या डॉक्युमेंटमध्ये वेन्स यांच्याशी संबंधित माहिती पाठवण्यात आली होती.
मायक्रोसॉफ्टने म्हटले- इराणी हॅकर्सना लक्ष्य केले
ट्रम्प यांच्या प्रचाराच्या विधानाच्या एक दिवस आधी, शुक्रवारी सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टने एक अहवाल जारी केला होता. जून महिन्यात इराणी हॅकर्सनी ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराला लक्ष्य केल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
रिपोर्टनुसार, हॅकर्सनी रिपब्लिकन पक्षाशी संबंधित राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला लक्ष्य केले होते. मायक्रोसॉफ्टच्या थ्रेट ॲनालिसिस सेंटरने सांगितले की ट्रम्प यांच्या मोहिमेला फिशिंग ईमेल पाठवण्यात आला होता.
केंद्राच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांत इराणी हॅकर्सने केलेल्या हॅकिंग हल्ल्यांची संख्या वाढली आहे. मायक्रोसॉफ्टने 2020 मध्येही असाच अहवाल जारी केला होता. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या प्रचारावर प्रभाव टाकण्यासाठी इराणी हॅकर्सकडून कट रचण्यात आल्याचे सांगण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App