India-Canada Dispute : कॅनडाचे विरोधी पक्षनेते म्हणाले, ”भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत, मी पंतप्रधान बनलो तर…”,

ट्रूडोंवर केली आहे टीका, जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कॅनडा आणि भारत यांच्यात वाद सुरूच आहे. दरम्यान, कॅनडाच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या प्रमुखाचे म्हणणे आहे की, आठ वर्षे सत्तेत राहूनही जस्टिन ट्रूडो भारतासोबत संबंध वाढवू शकलेले नाहीत. दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण संबंध आहेत. जर ते कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष झाले तर ते भारत आणि कॅनडामधील चांगले संबंध पुन्हा प्रस्थापित करतील. India Canada Dispute Canadas Opposition Leader Says Relations with India are Important

कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे अध्यक्ष आणि कॅनडाच्या संसदेतील विरोधी पक्षाचे नेते पियरे पॉइलीव्हरे मंगळवारी एका रेडिओ कार्यक्रमात सहभागी झाले होते . येथे ते म्हणाले की, आम्हाला भारतासोबत औपचारिक संबंध हवे आहेत. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. आम्ही एकमेकांशी असहमत असू शकतो परंतु औपचारिक संबंध आवश्यक आहे.

41 कॅनेडियन अधिकाऱ्यांना  कॅनडाला परत पाठवणाऱ्या प्रकरणाचा ठपका त्यांनी ट्रूडोवर ठेवला. ते म्हणाले की ते असक्षम आणि अव्यव्हारी आहेत. कॅनडाचा केवळ भारताशीच नाही तर जगातील प्रत्येक महासत्तेशी वाद आहे. कॅनडातील हिंदू मंदिरांच्या तोडफोडीच्या प्रश्नावर पॉइलीव्हरे म्हणाले, “माझ्या मते हिंदू मंदिरांचे, लोकांचे  किंवा मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना फौजदारी खटल्यांचा सामना करावा लागेल.”

India Canada Dispute Canadas Opposition Leader Says Relations with India are Important

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात