”इंडिया आघाडीत पंतप्रधान पदासाठी १८ उमेदवार इच्छुक, प्रत्येक पक्षाला हवंय आपल्या नेत्यासाठी पंतप्रधानपद”

अखिलेश यादव यांचे भावी पंतप्रधान असे पोस्टर झळकल्यानंतर भाजपाने साधला निशाणा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगड या पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने प्रयत्नात व्यस्त आहेत. नेत्यांमध्ये जोरदार शब्दयुद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत लखनऊमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे पंतप्रधानपदाचे पोस्टर चर्चेत आहे. यावरून भाजपकडून इंडिया आघाडीवर हल्लाबोल करण्यात आला  आहे. 18 candidates are interested for the post of Prime Minister in India Alliance

समाजवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर सपा प्रमुख अखिलेश यादव यांना ‘भावी पंतप्रधान’ असे वर्णन करणाऱ्या पोस्टरवर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग म्हणाले, ‘इंडिया आघाडीतील जवळपास १८ उमेदवार आधीच पंतप्रधान होण्यासाठी इच्छुक आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना  पंतप्रधान व्हायचे आहे. नितीश कुमार, केसीआर आणि स्टॅलिन यांनाही पंतप्रधान व्हायचे आहे. अरविंद केजरीवाल असो वा लालू यादव यांचे कुटुंब असो की अखिलेश यादव, प्रत्येकालाच पंतप्रधान व्हायचे आहे. तसेच ते पुढे म्हणाले, ‘इंडिया आघाडीला देशात अपंग सरकार आणायचे आहे, परंतु देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार आणायचे आहे.”

हे पोस्टर समाजवादी पक्षाकडून अशा वेळी आले आहे, जेव्हा मध्य प्रदेशात जागांसाठी त्यांचा काँग्रेसशी वाद सुरू आहे. या पोस्टर्समध्ये सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना भावी पंतप्रधान म्हणून दाखवण्यात आले आहे. बरं, हे पोस्टर्स जुने आहेत, पण लखनऊमधील पक्ष कार्यालयाबाहेर जुनी पोस्टर्स पुन्हा लावण्यात आली आहेत.

18 candidates are interested for the post of Prime Minister in India Alliance

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात