ड्रग्स माफिया ललित पाटील ठाकरेंचा शिवसैनिक; तर सलमान फाळके, शानू पठाणचे सुप्रिया सुळे, आव्हाडांबरोबर फोटो!!

प्रतिनिधी

मुंबई : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणाला दररोज वेगवेगळी गुन्हेगारी आणि राजकीय वळणे लागत असून ललित पाटील विषयी ठाकरे शिवसैनिकांनी प्रश्न उपस्थित करतात स्वतः ललित पाटील हाच ठाकरेंचा शिवसैनिक असल्याचे समोर आले तर ट्रक्स तस्करीत त्याच्याबरोबरचे साथीदार सलमान फाळके आणि शानू पठाण या दोघांचे खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबरचे फोटो समोर आलेत. Drug mafia Lalit Patil Thackeray’s Shiv Sainik

उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ललित पाटीलला व्यक्तीला अटक करण्याचे आदेश दिले होते. परंतु. या प्रकरणात मंत्री दादा भूसे, मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर आरोप केले. पण, ज्यांनी आरोप केले त्यांना कुणाचा आशिर्वाद होता?, असा सवाल शिंदे गटाच्या सचिव आणि प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांनी केला. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर सलमान फाळके आणि शानू पठाण यांचे फोटो दाखवले.

2020 मध्ये ललित पाटील हे उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते होते. ललित पाटील याला शिवबंधन बांधतानाचे त्यांचे फोटो समोर आले होते. ड्रग्ज प्रकरणात गणेश शर्मा, गोविंदा साबळे अशी एकूण आठ नावे सापडली आहेत. त्यातील कळवा मुंब्रा येथील सलमान फाळके हे नावही समोर आले आहे. सलमान फाळके याच्याकडे ५४ ग्राम एमडी ड्रग्ज सापडले. त्याच्यासोबत शानू पठान हा पण होता, असे त्यांनी सांगितले.

सलमान फाळके यांचा जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत फोटो आहे. शानू पठान हा जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत फोटोत दिसतो आहे. सुप्रिया सुळे यांच्यासोबतही सलमान फाळके याचे फोटो आहेत. हे फोटो पुरेसे बोलके आहेत. तुम्ही काचेच्या घरात राहता आणि दुसऱ्याचा घरावर दगड फेकता अशी टीका त्यांनी केली. खासदार सुप्रिया सुळे या संसदरत्न आहेत. पण, त्याचे आरोपींसोबत फोटो कसे?? जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यांनी याचे उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Drug mafia Lalit Patil Thackeray’s Shiv Sainik

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात