विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेच्या दोन्ही गटाचे मिळावे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांची खेचाखेच आणि मराठा आरक्षण या भोवती फिरले. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यात जरांगे पाटलांचे कौतुक केले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होत मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. Jarange Patil praised by Uddhav Thackeray and eknath shinde maratha reservation assurance
मराठा आरक्षणाचे शांततामय मार्गाने आंदोलन सुरू ठेवणाऱ्या जरांगे पाटलांचे मी कौतुक करतो अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले भाषण मध्येच थांबवून प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जाऊन ते नतमस्तक झाले आणि त्यानंतर कोणालाही कोणाचेही काढून न घेता, कोणावरही अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देऊ असे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले :
भगवी लाट मला इथं पहायला मिळत आहे. आम्ही सत्तेला लाथ मारली पण बाळासाहेबांचा विचार खाली पडू दिला नाही. बाळासाहेबांचे विचार आमच्यासाठी शिवतीर्थ आहे. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही मुठमाती दिली. खंजीर खुपसण्याचं काम तुम्ही केलंय. हे हमासची गळाभेट देखील घेतील. किती लाचारी करणार? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचाराचा गळा घोटला. यांनी निर्लज्यपणाचे कळस गाठले. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आम्हाला दिल्यानंतर यांनी शिवसेनेच्या खात्यातील पैसे 50 कोटी मागितले. माझ्यापेक्षा जास्त यांना कोण ओळखतं का? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे. यांना खोके नाही तर कंटेनर पाहिजे.
अब्दुल सत्तारांचं कौतूक
आज अब्दुल सत्तार पण आमच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे. स्वतः एसटीच्या गाडीमध्ये बसून कार्यकर्त्यांसोबत आले आणि ते कार्यकर्त्यांबरोबर बसले त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांचं कौतुक केलं.
तुमची तुमचा चेहरा आरश्यात पाहवं. लाज वाटल्याशिवाय राहणार नाही. एवढे मुखवटे तुम्ही बदलले. मी मुंख्यमंत्री झालो तरीही मी माझ्यातला कार्यकर्ता मरू दिला नाही. सोन्याचा चमचा घेणाऱ्यांनीच मुख्यमंत्री होणार, असं काही लिहिलं आहे का? मुख्यमंत्री बदलणार असं तुम्ही म्हणता. पण कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. मी माझ्या परिवालाला वेळ दिला नाही. माझ्या मुलांना वेळ दिला नाही.
माझी आई मृत्यूशय्येवर होती. लोकसभा निवडणूक होती. जवारला घाट चढत असताना मला डॉक्टरांचा फोन आला, मी सगळं आटोपून 9 वाजता पोहोचलो. माझ्या आईचा मृत्यू झाला होता, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.सीतेचं हरण करण्यासाठी रावणाने साधूचं रूप घेतलं होतं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी संधीसाधू बनले, 2006 साली जेव्हा पूर आला होता. तेव्हा तुम्ही बाळासाहेबांना मातोश्रीवर एकटं सोडून तुम्ही हॉटेलवर रहायला गेलात. जनता तुम्हाला माफ करणार नाही. जे बाळासाहेबांचे होऊ शकले नाहीत. ते तुमचे काय होणार?
राज ठाकरेंबद्दल दिघे साहेब चांगलं बोलले तेव्हा त्यांचे पंख छाटण्याचं काम सुरू झालं. मला विचारण्यात आलं. आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठं आहे. तो फकिर माणूस.. त्याच्याकडे काय असणार? एकनाथ शिंदे यांना खोट्या घोटाळ्यात अटकवण्याचं काम तुम्ही केलं. पण आम्ही तुमचाच टांगा पलटी केला.
भाषण थांबून एकनाथ शिंदे शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक!!
मराठा समाजातील युवकांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने तुम्हाला शब्द देतो, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले भाषण मध्येच थांबवले. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी गेले. तिथे नतमस्तक झाले आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा भाषण सुरू केले. मराठा समाजाला आरक्षण देणार हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर नतमस्तक होऊन मी सांगतो आहे की कोणत्याही समाजाचे आरक्षण काढून न घेता मी मराठा समाजाला आरक्षण देईन. एकनाथ शिंदेंच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजाची लढेन, असे भावपूर्ण उद्गार एकनाथ शिंदे यांनी काढले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App