हाफीज सईदचा म्होरक्या दहशतवादी, लष्कर ए तैय्यबाचा कमांडर हाशिम अली अक्रमला गाजा पट्टीत ठोकले!!

वृत्तसंस्था

गाजा : मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड आणि लष्कर ए तय्यबा दहशतवादी संघटनेचा प्रमुख ऑफिस सहित याचा म्होरक्या दहशतवादी आणि लष्करी तैय्यबाचा कमांडर हाशिम अली अक्रम याला अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गाजा पट्टीत ठोकले. इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हाशिम अली अक्रम धावपळ करत असताना तो अज्ञात हल्लेखोरांसमोर आला आणि त्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर बेछूट गोळीबार करून त्याला संपविले. Lashkar-e-Taiba commander Hashim Ali Akram shoot

हा तोच हाशिम अली अक्रम होता, ज्याने हाफीज सईद याच्याबरोबर आपला एक सेल्फी मध्यंतरी शेअर केला होता. जम्मू काश्मीर मध्ये घुसखोरी करून अनेक दहशतवादी कारवायांमध्ये तो गुंतला होता.

इस्रायलने हमास दहशतवादी संघटनेविरुद्ध पुकारलेला युद्धादरम्यान पाकिस्तानात हमासच्या समर्थनासाठी अनेक रॅली आयोजित करण्यात त्याचा पुढाकार होता. हमास दहशतवादी संघटनेला लॉजिस्टिक सपोर्ट देण्यासाठी हाशिम अली अक्रम हा गाजा पट्टीत काही दिवसांपूर्वीच पोहोचला होता, पण त्याच वेळी जोरदार हवाई हल्ले सुरू केले आणि त्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी धावपळ करत असतानाच हाशिम अली अक्रमला अज्ञात बंदूकधाऱ्यांनी ठोकले.

गेल्या साधारण वर्षभरापासून पाकिस्तान मध्ये प्रमुख दहशतवाद्यांना अज्ञात बंदूकधाऱ्यांच्या गोळ्यांना बळी पडावे लागले आहे. हाशिम अली अक्रम धरून आत्तापर्यंत 18 दहशतवादी मारले गेले आहेत. त्यावरून पाकिस्तानी राज्यकर्ते भारताकडे संशयाचे बोट दाखवत आहेत. पण त्याचे कोणतेही पुरावे पाकिस्तानी राज्यकर्ते अद्याप सादर करू शकलेले नाहीत.

Lashkar-e-Taiba commander Hashim Ali Akram shoot

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात