विशेष प्रतिनिधि
पुणे : धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाने मराठी मनावर चांगलाच गारुड केलं होतं . आनंद दिघे यांचा संपूर्ण प्रवास या सिनेमातून महाराष्ट्रभरच नव्हे तर जगभर पोहोचला गेला . लवकरच आता धर्मवीर दोन हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . त्याचीही प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.या चित्रपटाच्या माध्यमातून ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला होता. आता प्रेक्षक ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘धर्मवीर’मध्ये अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. ठाण्यातील टेंभीनाका परिसरात धर्मवीर आनंद दिघे यांनी नवरात्र उत्सवाची सुरूवात केली होती. यंदा या टेंभीनाक्याच्या दुर्गेश्वरी देवीच्या उत्सवाला राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.Prasad ook News !
दरवर्षी अष्टमीला दुर्गेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात. अशा या भर गर्दीत रविवारी अचानक आरमाडा गाडी थांबली अन् भगवी वस्त्र परिधान करून आनंद दिघेंच्या रुपात असलेला प्रसाद ओक टेंभीनाक्याच्या देवीच्या दर्शनासाठी पोहोचला.
View this post on Instagram A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)
A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)
प्रसाद ओकला प्रत्यक्ष आनंद दिघेंच्या रुपात पाहणं हा भाविकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. प्रसाद देवीच्या मंडपात आल्यावर अनेक लोक स्तब्ध झाल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. देवीच्या दर्शनाला आलेली प्रत्येक माणसं अभिनेत्याकडे पाहत होती. यावेळी प्रसाद ओकने आनंद दिघेंच्या वेशभूषेत दुर्गेश्वरी देवीची महाआरती केली. आरती करताना प्रसादच्या बाजूला काही लहान मुलं उभी असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
अभिनेता प्रसाद ओकने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली आहे. “मा. गुरुवर्य आनंद दिघे साहेबांच्या रुपात आईचं इतक्या जवळून दर्शन मिळणं हे मी माझं परमभाग्य समजतो…काल देवीचे आशीर्वाद घेऊन धर्मवीर २ चा मुहूर्त शॉट घेतला…!!! चित्रीकरण लवकरच सुरु होईल…पहिल्या भागाइतकंच प्रेम आपण दुसऱ्या भागावरही कराल अशी आशा करतो…!!!”, असं प्रसादने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. दरम्यान, अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘धर्मवीर २’ हा बहुचर्चित चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App