भारतालाही चांगले संबंध हवेत, पण आधी पाकिस्तानने २६/११ आणि पठाणकोट हल्ल्याच्या दोषींचा न्याय करावा, पंतप्रधान शरीफ यांना राजनाथ सिंह यांनी सुनावले


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : भारतालाही पाकिस्तानशी चांगले संबंध हवेत; पण पाकिस्तानने आधी दहशतवाद्यांवर तत्काळ आणि कायमस्वरूपी कारवाई करावी, अशा शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सुनावले आहे. शरीफ यांनी काश्मीरसंबंधी केलेल्या वक्तव्याचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी समाचार घेतला आहे.India also wants good relations, but first Pakistan should bring to justice those responsible for 26/11 and Pathankot attacks, Rajnath Singh told Prime Minister Sharif

भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानच्या नियंत्रणात असलेल्या कोणत्याही भूभागाचा दहशतवादी हल्ल्यासाठी वापर व्हायला नको. २६/११ आणि पठाणकोट हल्ल्यातील दोषींना न्यायालयाच्या कक्षेत आणावे. राजनाथ सिंह म्हणाले, दहशतवाद संपविण्याच्या दृष्टीने काम करावे, एवढेच मला त्यांना सांगायचे आहे.



दहशतवाद, शत्रुत्व आणि हिंसाचारमुक्त वातावरणात भारताला पाकिस्तानसोबत सामान्य संबंध हवे आहेत. तसे वातावरण निर्माण करायची जबाबदारी पाकिस्तानची आहे. अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय चर्चेत दहशतवादावर चर्चा केल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

भारत आणि अमेरिकेत शिक्षणासह व्यापार, गुंतवणूक, पायाभूत सुविधा, डिजिटल, हवामानबदल, ऊर्जा तसेच संरक्षणाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. अमेरिकेतील संरक्षण कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी राजनाथ सिंह यांनी आमंत्रण दिले आहे. त्यातून मेक इन इंडिया मोहिमेला प्रोत्साहन मिळेल, असे ते म्हणाले.

India also wants good relations, but first Pakistan should bring to justice those responsible for 26/11 and Pathankot attacks, Rajnath Singh told Prime Minister Sharif

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात