इम्रान खान यांच्या अडचणींमध्ये मागील काही दिवासांपासून कायम वाढ होत आहे.
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना सात वर्षांची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांचा पक्ष पाकिस्तान तहरी-ए-इन्साफने म्हटले आहे की, न्यायालयाने 2018 मध्ये दोघांचे लग्न कायद्याचे उल्लंघन असल्याचे सांगत आपला निर्णय दिला आहे. गेल्या काही काळापासून इम्रान खान यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. पाकिस्तानात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी या आठवडय़ात वादांनी घेरलेल्या इम्रान खान यांच्यासाठी हा तिसरा प्रतिकूल निर्णय आहे.Imran Khan and his wife sentenced to 7 years in illegal marriage case
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इम्रान खान यांना गुरुवारी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लढवण्यासही मनाई करण्यात आली आहे. इम्रान खान सध्या तुरुंगात आहे आणि अलीकडेच त्यांना सरकारचे संवेदनशील गोपनीय दस्तऐवज सार्वजनिक केल्याबद्दल 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिवाय तोषखाना प्रकरणात त्याला त्याच्या पत्नीसह सरकारी भेटवस्तू सोबत ठेवल्याबद्दल 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती.
बुशरा खानवर तिच्या पूर्वीच्या पतीपासून घटस्फोट आणि इम्रान खानशी लग्न करण्यासाठी इस्लामने दिलेला प्रतीक्षा कालावधी पूर्ण न केल्याचा आरोप होता. या कालावधीला “इद्दत” म्हणतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App