विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : काश्मीरच्या मुद्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात अण्वस्त्र युद्धाची शक्यता आहे. भारताला मी इतर कुणापेक्षाही जास्त चांगला ओळखतो, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. यामुळे भारत- पाकिस्तान संबंधात पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता असून त्यांच्या या विधानाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटण्याची देखील शक्यता आहे.Fwd: India-Pakistan nuclear war likely over Kashmir issue, tensions over Imran Khan’s statement
पाकिस्तानच्या जिओ टीव्हीला इम्रान खान यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये इम्रान खान म्हणाले, जोपर्यंत काश्मीरचा मुद्दा सुटत नाही, तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात अण्वस्त्र युद्धाची भीती कायम राहणार आहे. मी पाकिस्तानमध्ये सत्तेत येताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली होती.
मी त्यांना म्हणालो होतो की जर तुम्ही एक पाऊल पुढे आलात, तर मी दोन पावलं पुढे येईन.मात्र, माझे भारतात खूप सारे मित्र आहेत. त्यामुळे इतर कुणापेक्षाही मी भारताला चांगला ओळखतो, असं इम्रान खान म्हणाले. भारत आरएसएसच्या विचारसरणीच्या प्रभावाखाली असल्याचे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App